Nashik

मनखेड येथे ज्युनिअर कॉलेज इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या संख्येने संपन्न

मनखेड येथे ज्युनिअर कॉलेज इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या संख्येने संपन्न

डॉ चिन्मय पांडये यांच्या हस्ते आदर्श गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव
नुकताच मनखेड येथे ज्युनिअर कॉलेजचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून प्रतिकुलपती विश्व विद्यालय हरिद्वारचे डॉ चिन्मय पांडयेजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण स्नेहबंध शिक्षण संवस्थेच्या अध्यक्षा कलावती चव्हाण ह्या होत्या कार्यक्रमाच्या सर्व प्रथम मनखेड गावात प्रमुख डॉ चिन्मय पांडयेजी व मा खासदार हरीचंद्र चव्हाण संवस्थे च्या अध्यक्षा कलावती चव्हाण,समीर चव्हाण, आदी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांना सह गावातील व परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारच्या आदिवासी नृत्य पावरी, सांभळ,तसेच या परिसरातील भजनी मंडळ आदींच्या वाद्यांवर्ती सादर करीत अनुदानित आश्रम शाळे पर्यंत आनंद साजरा करत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मोठया जलोष्यात करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख उपस्थितांच्या वतीने अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन विश्व विद्यालयाचे डॉ चिन्मय पांडयेजी मा.खासदार हरीचंद्र चव्हाण संवस्थेच्या अध्यक्षा कलावती चव्हाण,समीर चव्हाण,आदींच्या हस्ते या ज्युनिअर कॉलेजचे भूमिपूजन झाले. त्यानंतर उपस्थित जनसमुदाय विद्यार्थी यांना मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले तसेच कुमारी आयेशा मणियार या विद्यार्थिनीने गायत्री परिवार यांचे कार्यासंदर्भात आपल्या इंग्रजी भाषेत अतिशय उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले
उपस्थित जनसमुदाय शिक्षकांनी आयशा मणियार चे मनापासून अभिनंदन केले.
त्यानंतर
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना आदर्श गुणवन्त शिक्षक पुरस्कार
सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमाच्या अनुसंगाणे या मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुध्दा आयोजित करण्यात आले होते त्यासाठी
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व मेहनत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तेथील शाळेचे मुख्याध्यापक नासिर मणियार,
उमेश चौधरी सर, संजय पगार प्राथमिक मुख्याध्यापक, दादाजी खैरनार ,सुनिता वाघ ,योगेश गोसावी ,अर्चना जाधव, विणेश भामरे, पंकज थोरात ,विजय पाटील, निर्मला भोये ,वसंत आहेर ,सहकारी शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिसरातील प्रत्येक गावांत स्वतः जाऊन आजारी व्यक्तींची यादी तयार करून आजारी व्यक्तींना तपासणी व उपचारास येण्यासाठी व या कार्यक्रमाला अतिशय मेहनतीची तयारी करून कार्यक्रमाची रूपरेषा उंचावली या बद्दल या भागातील सर्व ग्रामस्थ पालक यांनी अनुदानित माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले.
देव संस्कृती विश्वविद्यालयाचे हरिद्वार कूलपती डॉ. चिन्मयची पांड्या यांनी आपल्या उदभोधन महाभारतातील उदाहरण देऊन याबातत तुकाराम यांच्या जीवनातील एक उदाहरण सांगितले की संत तुकारामांच्या घरी दोन व्यक्ती येतात आणि ते सांगतात की आम्हाला तुमच्या घरी राहायचे आहे संत तुकाराम सांगतात माझ्या घरी एवढी जागा आहे एक जण उभा राहू शकतो आणि एकदम झोपू शकतो अशाप्रकारे आळीपाळीने एक जण उभं राहायचं एक जण झोपायचा चे दोन व्यक्ती आले होते त्यांनी संत तुकारामांचे मन किती मोठा आहे याची परीक्षा घेतली ते दोन व्यक्ती हे संत तुकारामांचे परीक्षा घेण्यासाठी आले होते दोन्ही व्यक्ती देव होते.
अर्थ असा होता मनुष्य कितीही लहान असला तरी चालेल पण त्याचं मन मोठ असलं पाहिजे.
मनखेड मध्ये आलेल्या सर्व लोकांना हरिद्वार येण्याचं आमंत्रण केले.
हरिद्वार येथे हजार लोक मोफत राहतात व किती हजार लोक मोफत जेवण करतात. ई
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन पी भोये मॅडम, व व्ही एस पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक नसिर मणियार सर यांनी मानले.या कार्यक्रमाला उपस्थित सुरगाणा नागरपंचायतिचे स्वीकृत नगरसेवक रमेश थोरात, नगरसेवक जगूदादा कानडे, ललित चव्हाण, भावडू चौधरी आदींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button