क्षुल्लक वादातून वडील व भावाचा खून; नांद्रा येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
चिलगांव ता. जामनेर प्रतिनिधी (गजानन सरोदे)गावातील लोकांशी नेहमी भांडण का करतो ? यावरून विचारणा केल्याने संतप्त झालेल्या माथेफिरूने आपले वडील व भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना येथून जवळच असलेल्या नांद्रा प्र. लो. या गावी घडली आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पहूर येथून जवळच असलेल्या नांद्रा प्र. लो. या गावातील रहिवाशी निलेश आनंदा पाटील याचे गावातील काही लोकांशी वाद होते. यावरून याला त्याचे वडील आनंदा कडु पाटील व लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील यांनी तु गावात लोकांशी नेहमी भांडण का करतो व विनाकारण वाद का घालतो? अशी विचारणा करून समजावण्याचा प्रयत्न करत होते. या गोष्टीचा मोठा भाऊ निलेश आनंदा पाटील यास वाईट वाटले व रागात भरात येऊन त्याने घरातुन चाकू आणून वडील आनंदा पाटील आणि लहान भाऊ महेंद्र पाटील या दोघांच्या पोटावर सपासप वार करून त्यांची हत्या केली. हा सर्व थरार काल रात्री घडला.
या बाबत पहुर पोलिस स्टेशनला अश्विनी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून निलेश पाटील याच्या विरोधात भाग ५ गुरन २०१/२० भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पहूर पोलिस यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी निलेश पाटील यास अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून पहूर पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश सिंह परदेशी हे करत असून त्यांना बीट अंमलदार अनिल अहिरे, पो. कॉ.ईश्वर देशमुख, शशिकांत पाटील हे सहकारी तपासात सहकार्य करीत आहेत. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून आपला सख्खा भाऊ व वडिलांची हत्या करण्यात आल्याचे माहित पडताच परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे






