Maharashtra

अरण केंद्राची ऑनलाइन डिजिटल शिक्षण कार्यशाळा रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न.

अरण केंद्राची ऑनलाइन डिजिटल शिक्षण कार्यशाळा रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न.

डिजिटल ऑनलाईन कार्यशाळेसाठी मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर व ग्लोबल टीचर अवार्ड 2020 प्राप्त श्री. रणजीत सिंह डिसले, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर विलास काळे, उपळाई बु केन्द्रांचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे सह केंद्र अरण व उपळाई बु केंद्रांतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात केंद्रप्रमुख डॉक्टर विलास काळे यांच्या प्रस्ताविकाने झाली. कार्यशाळेचा उद्देश व्यक्त केला‌. श्री रणजीत सिंह डिसले यांनी या कार्यशाळेत हसत-खेळत सर्वांशी संवाद साधला. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून शाळा बंद आहेत या काळात विद्यार्थी ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्याने जोडला जावा, अध्यापनात विद्यार्थ्याचे अवधान टिकवण्यासाठी व आपण विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन शिक्षण देत आहोत त्या ॲप मधील असणाऱ्या नवनवीन फीचर्स विषयी माहिती सांगितली. तसेच भारतीय शिक्षण पद्धती व परदेशातील शिक्षण पद्धतीमध्ये वापरले जाणारे डिजिटल तंत्रज्ञान तसेच इंटरनॅशनल स्कूलचा शिक्षक विचार करतो तो विचार आपण करावा. परदेशामध्ये शिक्षकांना परमनंट सॅलरी नसते त्यांचे टीचिंग लायसन ठराविक कालावधीनंतर अपग्रेड करावे लागते स्वतः ट्रेनिंग घ्यावी लागतात .तेथे त्यांच्या कामगिरीवर पेमेंट दिले जाते. परदेशातील शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त शाळाबाह्य कोणते ही काम दिले जात नाही याबाबत बरीच माहिती दिली. शिक्षकांनी काल सुसंगत अध्यापनाची तंत्रे निवडावी विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल असे कौशल्यावर आधारित उपक्रम राबवावेत स्वतः प्रशिक्षित व्हावे. आपण 21 व्या शतकातील शिक्षक आहोत एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करु कराव्यात. तसेच परदेशात पाहिलेल्या शाळा भेटलेले शिक्षक विद्यार्थ्यांशी साधलेला सुसंवाद याचे अनुभव शेअर केले. प्रत्येक शिक्षकाने अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबत आव्हान केले. व शेवटी तंत्रस्नेही शिक्षक श्री नवनाथ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button