Amalner

Amalner: कार्तिक स्वामी मंदीर यात्रा दी. 15 रोजी… भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.. संस्थान तर्फे आवाहन…

Amalner: कार्तिक स्वामी मंदीर यात्रा दी. 15 रोजी… भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.. संस्थान तर्फे आवाहन…

अमळनेर सालाबादा प्रमाणे मौजे अंतुर्ली ता. अमळनेर जि.जळगांव येथील अती प्राचीन कार्तीक स्वामी मंदीर यात्रा दि. १५/११/२०२४, वार – शुक्रवार व दि. १६ / ११ /२०२४ वार – शनिवार या दोन दिवशी महिलांसाठी उघडणार आहे. दर्शनाचे वेळापत्रक – कार्तीक पौर्णिमा वार शुक्रवार दि.१५/११/२०२४ रोजी सकाळी ठिक – ६.१९ मी. पासून प्रारंभ होणार आहे. तसेच रात्री २.५८ वा. पर्यंत राहील.
कृतीका नक्षत्र दि.१५/११/२०२४ रोजी रात्री ९.५५ वा. प्रारंभ होणार आहे. तर शनिवार दि.१६/११/२०२४ रोजी सात्री – ७.३५ वा. मिनीटापर्यंत आहे. पौर्णिमा व कृतीका नक्षत्र हा सोबत येणारा अतिशय पवित्र व शुभ योग असतो. हा योग दि.१५/११/२०२४ रोजी रात्री ९.५५ वा. पासून तर त्याच रात्री – २.५८ वा. पर्यंत आहे.

हया तिथीवर महिला आपल्या सर्व परिवारासोबत दर्शन घेतल्यास सात जन्म धनवान राहतात अशी कथा आहे. हा योग फक्त रात्री – ६ तासासाठी आहे. हिवाळयाचे दिवस व रात्रीचे वातावरण असल्याने वयोवृध्द मंडळी एवढया थंडीत जास्तवेळ रांगेत असे उभे राहु शकणार नाहीत किंवा त्यांना पेलवणार नाही. म्हणून अशा स्त्री-पुरुष पौर्णिमा व कृतीका नक्षत्र म्हणजे दि.१५/११/२०२४ व दि. १६ / ११ /२०२४ हया दिवशी माता भगिणीसह दर्शन घेवू शकतात.

ज्या वेळेस माता पार्वती व शंकर भगवान यांनी आपले दोघ पुत्र श्रीगणेश व कु.कार्तीक यांना पृथ्वी प्रदक्षीना घालुन जो लवकर परत येईल त्याला पुर्ण देवत्व प्रदान केले जाईल असे सांगितले. त्यानुसार कार्तीक स्वामी आपले मोर पक्षी हे वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षीणेस निघाले कार्तीक स्वामी पृथ्वी प्रदक्षिना घालुन पतर आले असतांना त्यांच्या लक्षात आले की आपले मोठे बंधु श्री. गणेश यांना पृथ्वी प्रदक्षिणा न घालता आपले आई-वडील माता पार्वती व भगवान शंकर यांनाच प्रदक्षिणा घालुन आपले कर्तव्य पुर्ण केले हे जेव्हा कार्तीक स्वामींना समजले तेव्हा ते क्रोधीत होवून तेथून निघून गेले व जातांना महिला भगिनींनी जर माझे पौर्णिमा व कृतीका नक्षत्र सोडून इतर दिवशी दर्शन घेतले तर त्यांना सात जन्म वैधव्य प्राप्त होईल. म्हणून माता भगीनीं इतर दिवस स्वामींचे दर्शन घेत नाही. परंतु कार्तीक पौर्णिमा व कृतीका नक्षत्र हा स्वामींचा जन्म दिवस असल्याने बाल्य अवस्थेत असतांना या तिथीवर महिला दर्शन घेवू शकतात.
अंतुर्ली ता. अमळनेर येथील कार्तीक स्वामी मंदीर हे अतीप्राचीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य काळात इ.स. १६५३ साली स्थापन झाले आहे. इ.स. १६३५ साली तत्कालीन सदगृहस्य श्री. रामराव पाटील यांना प्रत्येक्ष स्वामीनी स्वप्नात येवून दृष्टांतदिला होता की, ज्या वेळेस माता पार्वती व शंकर भगवान यांनी आपले दोघ पुत्र श्रीगणेश व कु.कार्तीकेस यांना पृथ्वी प्रदक्षीना घालुन जो लवकर परत येईल त्याला पुर्ण देवत्व प्रदान केले जाईल. त्यानुसार कार्तीक स्वामी आपले मोर पक्षी हे वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षीणेस निघाले असता त्यांनी जास्तीत जास्त प्रवास हा नदी, नाले व तलाव या मार्गाने केला होता. प्रवासात असतांना अंतुर्ली येथील टेकडीवर काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते.
ही माहिती श्री. रामराव पाटील यांना गावकऱ्यांना बोलावुन सांगितली असता सर्व गावकरी आनंदाने भारावून गेले होते. त्यानंतर त्या टेकडीवर सर्व गावकरी रोज दिवा लावायला लागले. बरेच वर्ष निघुन गेल्यावर श्री. पाटील यांनी गावकऱ्यांसोबत इ.स.१६५३ साली कार्तीक स्वामींचे मंदीर त्याच टेकडीवर बांधले अशी अख्याईका आमच्या गावाचे पुर्वज नंतर येणाऱ्या पिढ्यांना सांगत आले आहेत.
प्रत्यक्ष कार्तीक स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिर्थस्थळाला खुप महत्व प्राप्त झाले आहे. दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक श्रध्देने मंदीरात येवून मनोभावे नवस / मानता म्हणून जातात. नंरतच्या काळात त्यांची मानलेल्या ईच्छा प्रती योग्य ती फलप्राप्ती झाल्याचे अनेक भाविक सांगतात. त्यानुसार ते सर्व परिवारासोबत मानता फेडण्यासाठी येत असतात. आता त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य असे मंदीर (साधारणतः ७१ फुट उंचीचे ) बांधले आहे.
मागील वर्षी अमळनेरचे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी १६ लाख रु. किमतीचे भक्त निवास बांधले गेले. तसेच २० लाख रु. किमतीचा सभामंडप देखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व मंदीर संस्थांन मा.नामदार यांचे प्रती आभार व्यक्त करत आहे. येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थ व सस्थांन यांनी मिळून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विश्राम करण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिड लाख ते दोन लाख भावीक दर्शन घेण्यासाठी येतात त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावी याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांचे कर्मचारी दोनदिवस अखंड आरोग्य सेवा प्रदान करतात. तसेच मारवड पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वतः जातीने लक्ष घालुन सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिशय चोख बंदोबस्त ठेवतात. या दोन्ही दिवशी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठया प्रमणात सहकार्य लाभते.
तसेच दर्शनाला राज्यातले व राज्या बाहेरचे म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात इ. राज्यातून देखील भाविक यात्रेसाठी येत असतात.
तरी जास्तीत-जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती / आव्हान संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी ग्रामस्थांच्या व संस्थांनच्या वतीने केले आहे. तरी आपण सर्वांनी दर्शनाचा आवश्यक लाभ घ्यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button