Nashik

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमुळे अन्नछत्र यशस्वी करू -गणेश बनकर .

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमुळे अन्नछत्र यशस्वी करू -गणेश बनकर

शांताराम दुनबळे

कोरोना परिस्थितीत देशात २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्पू जाहीर केला त्यानंतर लगेचच २३ मार्च देशात व राज्यात संचारबंदी ला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून सुमारे ६० दिवस पिंपळगाव मध्ये अन्नछत्र च्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत अन्न व जीवनावश्यक वस्तू पोहूचू शकलो हे फक्त पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमुळेच अशे प्रतिपादन पिपळगाव ग्रामपंचायतिचे सदस्य गणेश बनकर यांनी केले पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मचारी कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की
महाराष्ट्रात सुरू झालेल्या संचारबंदी मुळे नागरिकांना आपले छोटे मोठे व्यवसाय बंद करावे लागले त्यात हातावर प्रपंच असलेल्या नागरिकावर तर उपासमारीची वेळ आली हीच बाब लक्षात घेत माझ्या पिंपळगाव बसवंत मध्ये कोणीही गरीब उपाशी जोपु नाही म्हणून अन्नछत्र ग्रुप च्या माध्यमातून ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्या मदतीने गरजू लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय सुरू केली.

सुरवातीला थोडया प्रमाणात जेवण बनवावे लागत होते नंतर परप्रांतीय मजूराची संख्या वाढू लागली आणि जेवणाची व्याप्ती वाढवावी लागली सकाळी नास्ता दुपारी आणि सायंकाळी जेवण दिले जात होते ये सर्व जेवण बनवणे आणि त्याची वाटप करणे हे सर्व कामे पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचारी यांनी कुठलाही ज्यादा मोबदला न घेता निस्वार्थी पणे केले यात महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग लाभला त्यांनी केलेल्या या निस्वार्थी सेवेतुन उतराई होणे तर शक्य नाही पण एक कृतज्ञता म्हणून मी माझा वाढदिवसाच्या दिवशी फक्त या कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून हा कृतज्ञता सोहळा संपन्न करत आहोत.
या सोहळ्यात आमदार दिलीप बनकर विश्वास मोरे यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश बकुरे सुनिल मोरे राकेश देशमुख चेतन भिडवे बैरागी मॅडम यांनी आपली मनोगत व्यक्त केले यावेळी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा, अग्निशमन, आरोग्य व दिवाबत्ती व वाचनालय आधी विभागाना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊनआमदार बनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
याप्रसंगी सरपंच अलका बनकर ,उपसरपंच अश्विनी खोडे,संजय मोरे,सुहास मोरे,नंदू गांगुर्डे, बापू कडाळे ,अंकुश वारडे, सुरेश गायकवाड,उमेश जैन,आशिष शाह बाळा बनकर ग्रामसेवक जंगम साहेब हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button