Amalner: काँग्रेस आणि मविआ तर्फे पाणीपट्टी वरील 2% व्याज दर रद्द करणेबाबत नगरपरिषदेला निवेदन…
अमळनेर काँग्रेस व महाविकास आघाडी तर्फे आज अंमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारण्यात येत असून ते आकारू नये याबाबत माननीय डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष भाऊ अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख एडवोकेट रज्जाक शेख, संदीप जी घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष तेली माजी युवक काँग्रेस अध्यक्ष मनोहर पाटील, अध्यक्ष किसान राष्ट्रवादी तुतारी लांडगे, गणेश गुप्ता, माजी नगरसेवक माजी नगरपरिषद कर निरीक्षक श्री सुखदेव होलार माजी नगरपरिषद ऑडिटर छोटू वैद्य आधी सर्वांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी यांच्या वतीने निरीक्षक चंद्रकिरण शिवदे, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे आणि स्थापना प्रमुख लौकिक समशेर यांनी नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका पटांगणात काँग्रेस पक्षाचे निवेदन स्वीकारले.






