Amalner

? Big Breaking…काय आहे गौडबंगाल पोलीस निवासस्थाने बनविण्या मागे..? हुश्श..!झाली एकदाची राजकीय आणि आर्थिक खेळी यशस्वी..!

? Big Breaking…काय आहे गौडबंगाल पोलीस निवासस्थाने बनविण्या मागे..?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे दि 1 नोव्हेंबर रोजी पोलीस बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचा उद्दघाटन सोहळा मा गृहमंत्री अनिल देशमुख मा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. या निवासस्थानांसाठी खूप मोठ्या प्रमाणात जर मेहनत घेतली असेल किंवा ही निवासस्थाने व्हायलाच पाहिजे यासाठी सर्वात जास्त आग्रह साहेबराव पाटील (ज्यांचा वास्तविक या सर्व शासकीय गोष्टींशी संबंध नाही) यांनी धरला होता. एव्हढे च नव्हे तर ते उपोषणाला देखील बसले होते. What is this..? आणि मन्ह ते काहीच लेन देणं नही तरी बी साल काम करी राह्यनू..? आता खूप मेहनती नंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हुश्श..! एकदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता तुम्ही म्हणाल कोणता मार्ग आणि कसला मार्ग..तर अमळनेर करांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की एव्हढं का बाबा हे प्रकरण मनावर घेतले गेले..? आता सध्या ज्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवासस्थाने आहेत तर हा भाग शहरातील सर्वात जास्त गर्दीचा आणि सर्वच दृष्टीने महत्वपूर्ण असा मध्यवर्ती भाग आहे.खरंतर याच ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवासस्थाने होणे आवश्यक होते. परंतु खूप मोठे गौडबंगाल या सर्व प्रक्रियेच्या मागे आहे.ह्या जागेवर मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स बनविण्याची योजना असून यातून करोडो रु ची उलाढाल होणार आहे. भविष्यात साधारण एक वर्षाने पुन्हा नगरपरिषद निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही खूप मोठी राजकीय आणि आर्थिक खेळी खेळली जात आहे. यात सर्वांचेच लाटे सोटे असणार आहे. राजकीय विरोध मोडून काढण्यासाठी स्वतः ची तिजोरी भरण्यासाठी, प्रत्येक नगरसेवकाच्या मालकीचे किंवा नातेवाइकांचे एकतरी दुकान या भविष्यातील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये असणार आहे.अशी दबक्या आवाजात संपुर्ण शहरात चर्चा सुरू आहे. बघू या भविष्यात काय काय पाहवयास मिळते ते..

तूर्त तरी बिचारे पोलीस बांधव मात्र या राजकारणाला बळी पडले आहेत. अगदी गावाच्या बाहेर असलेल्या या निवासस्थानां मुळे मात्र चांगलीच धावपळ त्यांची होणार आहे. कारण या निवासस्थानां पासून शाळा, महाविद्यालय, दवाखाने,बाजार,दुकाने,सर्व अत्यावश्यक सेवा दूर आहेत. या सर्व प्रकारात घी पडे किसीं और की थाली में और बासन धोये कोई और..अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button