चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा तालुका व शहर भारतीय काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने आज दिनांक 20 रोजी भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या 75 वी जयंतीनिमित्त जनशिक्षण संस्थानच्या प्रांगणात प्रतिमा पुजन करण्यात येवून उपजिल्हा रुग्णालयात रुणांना जळगांव जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांच्या हस्ते फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी जि.प.आरोग्य सभापती दिलीप पाटील,तालुकाध्यक्ष राजाराम पाटील,शहराध्यक्ष के.डी.चौधरी,उपजिल्हा रूणालयाचे डॉ.पवन पाटील,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,सुतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,अॅड.एस.डी.पाटील,रमाकांत सोनवणे,डाॅ अशोक कदम,संजीव सोनवणे,अशोक पाटील,शिरीष बडगुजर,किसान सेल प्रमुख शशिकांत साळुंखे,गणेश पाटील,जी.सी.पाटील,
शेख आरिफ शेख सिद्धीक,शेख मेहमुदअली सय्यद,संदीप बोरसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीतेसाठी रूग्णालयातील सर्व डॉक्टर,नर्सेस व कर्मचारी बंधू-भगिणींनी मोलाचे सहकार्य केले.







