?️अमळनेर कट्टा..कोरोना..दवाखाना..बंद घर आणि घरफोडी….!गेल्या आठवड्यात 2 घरफोड्या..!शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा..!
अमळनेर गेल्या आठवड्यात 2 घर फोड्या अमळनेर शहरात झाल्या आहेत. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना दवाखाना आणि घरफोडी असे सत्र शहरात सध्या सुरू आहे.घर मालक दवाखान्यात गेलेले घराला कुलूप आणि चोरटे घरात असे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेत चोरांनी दोन ठिकाणी घर फोडले असून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.गेल्या आठवड्यातील 3 घरफोड्या झाल्या आहेत. आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला कोरोना ची भीती ,दवाखाना,बिघडलेली मानसिक आणि शारीरिक स्थिती आणि त्यात चोरांची दहशत असे भितीदायक वातावरण शहरात निर्माण झाले आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटाला एकाचवेळी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील पोलिसांच्या एकूणच कार्य पध्दतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
जनता आधीच कोरोना च्या भयावह संकटाशी झुंज देत आहे. अतोनात पैसा खर्च करूनही माणसं पटापट मरण पावत आहे.एकीकडे दवाखान्यात लागणारा तुफान खर्च आणि दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा धुमाकूळ,पोलीस प्रशासन हतबल..असे अत्यन्त विचित्र वातावरण निर्माण झाले आहे.
त्रिमूर्ती नगर मधील रहिवासी सोनाली प्रवीण पाटील यांच्या घरी देखील चोरी झाली असून पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना धुळे येथे दाखल केल्यामुळे ११ रोजी ते घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले होते. १३ एप्रिल रोजी लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरट्याने ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही फिर्याद अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील रतनदादा नगरमधील गुरुकृपा कॉलनी च्या जवळ मुकेश दशरथ शिसोदे हे १२ एप्रिल रोजी दवाखान्याच्या कामासाठी धुळे येथे घर बंद करून गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली.१३ तारखेला परत आल्यानंतर दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरातील २२ हजार रोख, ९ हजार रुपयांचे लहान मुलांचे सोन्याचे दागिने,६ हजार रुपयांचे पायातील वाळे असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या आठवडाभरात आजारपणामुळे दवाखान्यात गेलेल्या 2 सामान्य लोकांची घरे फोडल्यात आली आहेत.अमळनेर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर,पेट्रोलिंग, रात्र पाळीच्या ड्युट्या इ वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अद्यापपर्यंत कोणत्याहि आरोपीला अटक नसून अद्यापही घर फोडयांचा धोका आहे.नागरिकांनी सतर्क रहावे आणि काळजी घ्यावी. आजूबाजूला घडणाऱ्या लहान सहान घटनांकडे लक्ष द्यावे. अज्ञात,अनोळखी लोकांकडे लक्ष दयावे संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पो निरीक्षक दिलीप भागवत यांनी ठोस प्रहारशी बोलतांना केले आहे.






