Erandol

सघंरत्न गायकवाड राज्यस्तरीय “कृषी युवा उद्योजक” पुरस्काराने सन्मानित

सघंरत्न गायकवाड राज्यस्तरीय “कृषी युवा उद्योजक” पुरस्काराने सन्मानित

विक्की खोकरे
एरंडोल – जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील शेतकरी व कृषी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १७ कृषीऋषीचा गौरव करण्यात आले.
यामध्ये एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष शालिक भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र व युवा शेतकरी सघरत्न गायकवाड यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती व्यवसायात यश संपादन केले त्याचा कार्याक्षेत्राचा गौरव म्हणून त्यांचा आज राज्यस्तरीय
*”कृषी युवा उद्योजक”* पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनलाल बाफना यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले
यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, नाबार्डचे जिल्हा प्रमुख श्रीकांत झांबरे, प्लांन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नंदिनीबाई जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य सी. एस. पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.
ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला व हाताळायला मिळत आहे, त्यामुळे त्यांचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला असल्याचे युवा शेतकरी सघरत्न गायकवाड यांनी व्यक्त केले
त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button