India

नोकरी साठी रिझ्यूम तयार करत आहात..? ही घ्या काळजी..!असा करा तयार रिझ्युम..!

नोकरी साठी रिझ्यूम तयार करत आहात..? ही घ्या काळजी..!असा करा तयार रिझ्युम..!

नोकरी मिळविणे तसे सध्या कठीण झाले आहे. सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. उत्कृष्ट उमेदवार शोधणे देखील नोकरी सेक्टर मध्ये तसे कठीणच झाले आहे. स्पर्धेच्या युगात जो तो आपण किती उत्तम आहोत हे सिद्ध करण्याच्या मागे लागला आहे. तसेही फर्स्ट इम्प्रेशन इस लास्ट इम्प्रेशन असे म्हणतात.. रिझ्युम हे देखील तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असते..तेंव्हा कोणत्याही ठिकाणी नोकरी साठी अर्ज करत असताना किंवा तुमचा रिझ्युम तयार करत असताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.खालील पद्धतीने रिझ्युम तयार केला तर नोकरी मिळविण्याची अर्धी लढाई तुम्ही जिंकलात च..चला तर मग पाहू या कसा बनवायचा रिझ्युम…

  1. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची.

रीझ्युम(CV) बनवताना लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा रीझ्युम बनवत आहात तुमच आत्मचरित्र नाही.त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुमच्यात असलेल्या फक्त क्वालिटी दाखवा. तुमच्या जीवनाविषयी माहिती देत बसू नका. रीझ्युम नेहमी हा शॉर्ट पण स्वीट असायला हवा. कारण तुमचा रीझ्युम त्या ठिकाणी तुमच प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून आपण क्वालिटी वर भर द्यावा क्वांटिटी पेक्षा.

2. शुद्धलेखन..शब्दांचे स्पेलिंग तसेच विरामचिन्हे

आपला रीझ्युम बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी ज्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रीझ्युम मध्ये योग्य ते शब्दांचे स्पेलिंग तसेच विरामचिन्ह वापरावे. एखाद्या वाक्यात काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असले किंवा शब्दांची रचना चुकीची असली तर ते वाक्य वाचायला अवघड जाते. बरेचदा यामुळे गोंधळ उडतो.

3.पैसे किंवा मानधनाचा उल्लेख नको

रीझ्युम बनवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे त्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्या कोणत्या नको असायला हव्या. त्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्यामध्ये पैशांचा उल्लेख कदापि नको असायला हवा. जसे मला एवढे मासिक वेतन पाहिजे तेवढे पाहिजे, किंवा आपण जर त्याआधी कुठे नोकरी केली असेल तर त्या ठिकाणाचे मासिक वेतन इ चा उल्लेख करू नये.

ह्या गोष्टींचा उल्लेख आपण जर आपल्या रीझ्युम मध्ये करता तर त्याविषयी नोकरी देणाऱ्यावर या गोष्टीचा वाईट प्रभाव पडू शकतो. म्हणून आपल्या रीझ्युम मध्ये कुठेही पैशांचा उल्लेख करू नका.

4.आवडी निवडी टाका

जीवनात प्रत्येकाला कश्याच्यातरी माध्यमातून काही गोष्टींची आवड निर्माण होते, ज्यामध्ये तो स्वतःच्या आवडी निवडी शिकून जातो. आणि मोठे झाल्यावर त्याला त्या गोष्टींना वेळ देता येत नाही. पण तरीही त्या कला आपल्यात जिवंत राहतात.तर बऱ्याच कंपनी मध्ये किंवा ऑफिस मध्ये त्यांच्या कामगारांसाठी कौशल्य विकासाची संधी असते. म्हणून आपला रीझ्युम बनवतेवेळी आपल्या रीझ्युम मध्ये आपल्या आवडी निवडी टाकाव्या जेणेकरून आपल्याला भविष्यात त्या गोष्टीची मदत होईल.

5.सोशल मिडियाचे खात्याचा उल्लेख

आजकाल एखाद्या व्यक्तीला चांगले जाणण्याचे साधन झाले आहे सोशल मिडिया ! जिथे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी आपण जाणून घेऊ शकतो. आपल्या रीझ्युम ला बनवत असताना आपण त्यामध्ये आपले सोशल मिडियाचे खाते टाकू शकता. आपल्याजवळ असलेले फेसबुक,इन्स्टाग्राम, लिंकडीन,ट्विटर इत्यादी खात्यांचा सामावेश आपण आपल्या रीझ्युम मध्ये करू शकतो. त्याचा हि आपल्याला चांगल्याप्रकारे फायदाच होऊ शकतो.

6.पत्ता अवश्य टाका

आपल्या रीझ्युम मध्ये पत्ता टाकणे म्हणजे आपण जेथे कायमस्वरूपी राहत असाल तो पत्ता टाकणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण जर त्या नोकरीसाठी निवडले जाता तर आपल्याला निवडल्या गेल्याचे पत्र आपल्या पत्त्यावरच भेटणार असते त्यासाठी आपण आपल्या रीझ्युम मध्ये आपला कायमस्वरूपी पत्ता टाकणे गरजेचे असते. आणि आपण जर आपला पत्ता टाकायला विसरलो तर आपल्याला त्या नोकरी विषयी जी माहिती मिळायची असेल ती मिळणार नाही. म्हणून आपण आपल्या रीझ्युम मध्ये पत्त्याचा उल्लेख करणे खूप आवश्यक आहे.

7.स्वतःची जाहिरात करा

येथे जाहिरात करणे म्हणजे रीझ्युम मध्ये स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने दर्शवणे होय. त्यासाठी आपल्यात असलेल्या कला गुणांना कागदावर एका चांगल्या पद्धतीने उतरवणे म्हणजे स्वतःची जाहिरात करणे होय. रीझ्युम मध्ये काही गोष्टी मांडण्याच्या वेळेस आपण लक्षपूर्वक त्या गोष्टींचा उल्लेख करायचे प्रयत्न करा जेणेकरून आपले वेगळे पण नोकरी देणाऱ्याला दिसून येईल. आणि आपल्याला ती नोकरी करायची संधी आपल्याजवळ चालून येईल.

8. अनुभव टाका

आपण जर एका ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी काम केले असेल तर आपण आपल्या रीझ्युम मध्ये त्या ठिकाणांचा उल्लेख आपल्या रीझ्युम मध्ये करणे आवश्यक आहे. त्यावरून नोकरी देणाऱ्या कंपनीला कळून जाईल कि तुम्ही त्यांच्या कशा प्रकारे उपयोगी येऊ शकता. आणि आपल्याला नोकरी मिळण्याची संधी चालून येऊ शकते. म्हणून रीझ्युम बनवतेवेळी आपण आपला अनुभव टाकायला विसरू नका.

9. साधेपणा

आपल्या रीझ्युम अत्यन्त साधा असावा.कोणतीही अनावश्यक डिझाइन नको. तसेच आपल्या रीझ्युमधील अक्षरं ठळक असणे आवश्यक आहे. साधेपणामुळे आपल्या रीझ्युमधील प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे दिसून येईल.

10.खात्री करा

असे म्हणतात “अति घाई संकटात नेई” म्हणजे एखाद्या कामाला आपण घाईमध्ये केले तर आपल्यावर संकट ओढवू शकते. रीझ्युम बनवतांना कोणतीही घाई न करता आपण शांततेत आपला रीझ्युम बनवावा. आणि शेवटी एक वेळ खात्री करून घ्यावी कि कोणती गोष्ट आपल्या रीझ्युम मध्ये टाकायची तर राहिली नाही ना! याची खात्री करा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button