Amalner

अमळनेर  पोलीस ठाणे आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

अमळनेर पोलीस ठाणे आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

अमळनेर

उद्या असणाऱ्या राष्ट्रीय बालिकादिनाच्या पार्श्वभूमीवर बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या हेतूने मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी महिला दक्षता समितीच्या महिलांचे मनोगत जाणून घेऊन मार्गदर्शन केले.या अंतर्गत आज पंचायत समितीच्या आवारातील पू साने गुरुजी सभागृहात अमळनेर पोलीस स्टेशन आयोजित महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.अमळनेर  पोलीस ठाणे आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला दक्षता समितीची बैठक संपन्नकार्यक्रमाचे अधक्ष मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे होते.या बैठकीत प्रा जयश्री साळुंके,ऍड तिलोत्तमा पाटील,माधुरी पाटील प्रमोदिनी, सुलोचना वाघ कोळी इ सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.मनोगतात बेटी बचाव बेटी पढाव या विषयाबरोबरच समाजात मुलींच्या छेडखानीचे वाढते प्रमाण,मुलांचे संगोपन, मुलींची असुरक्षितता,निर्भया पथकाची मागणी,महिला दक्षता समितीची मदत,इ विषय मांडण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांनी जिजाऊ बनून आपल्या मुलांना शिवबांसारखे घडविले पाहिजे की जेणे करून महिलांचा आदर राखला जाईल तसेच कर्तव्य बजावत असताना प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा दाखविता येत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करावे लागते. आधुनिक काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे. याची कारणमीमांसा होऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थांनी फक्त विद्यार्थी न घडविता एक चांगला नागरिक आणि माणूस घडविणे गरजेचे आहे. स्त्री पुरुष असे भेद करून मुलांना घडविण्या ऐवजी माणूस म्हणून संस्कार दिले तर सर्व समस्या दूर होतील त्याचप्रमाणे सर्व सुख सोई उपलब्ध होत आहेत त्यामुळे चंगळवाद वाढला आहे. पोलीस ठाण्यात मनुष्य बळ कमी असले तरी जे आहे त्यात योग्य प्रकारे नियोजन करून त्यांचा उपयोग केला जातो. असे मत व्यक्त केले.यावेळी कविता पाटील,योजना पाटील,अलका पवार,भारती पवार, अनिसा परवीन शेख,संगीता शिंदे, मनीषा परब, सुनीता वाघ, भारती शिंदे इ महिला सदस्य उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आयोजन मा शरद पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन देखील शरद पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button