Maharashtra

कोविड सेंटर येथे मा.आ. साहेबराव पाटील यांनी केली स्वखर्चाने तणनाशक फवारणी

कोविड सेंटर येथे मा.आ. साहेबराव पाटील यांनी केली स्वखर्चाने तणनाशक फवारणी

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर प्रताप कॉलेज येथील कोविड सेंटर परिसरात गवत वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सर्प ही निघाले होते.त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती.तसेच वाढलेल्या गवतामुळे डासांची उत्पत्ती होऊन कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डासांमुळे इतर आजार होऊ.

नये म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने प्रत्यक्षात हजर राहून तणनाशक फवारणी केली.तर कोविड सेंटर येथे पाणी सोडणाऱ्या कामगारांनी मानधन अभावी काम करण्यास नकार देत असल्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांना माहिती मिळाल्याने साहेबराव पाटील यांनी खिशातून 5000 रुपये दिले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भूषणकुमार फेगडे यांनी सदर कामगारांना 15000 रुपये मानधन देऊन.

त्यांची नाराजी दूर करत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोविड सेंटर येथील पाण्याचा प्रश्नही सोडवला.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील ,न.प.च्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,संजय चौधरी,काँग्रेसचे नेते गोकुळ आबा बोरसे,बापू साळुंखे आदी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button