Faijpur

पाडळसा प्रा.आ.केंद्रात नारीशक्ती गृप तर्फे आशा स्वयंसेवीकांचा गौरव व वृक्षारोपण

पाडळसा प्रा.आ.केंद्रात नारीशक्ती गृप तर्फे आशा स्वयंसेवीकांचा गौरव व वृक्षारोपण

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

अमृता पाटील व सौ.दिपाली चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण

फैजपूर : कोरोना महामारीच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता आपले सामाजिक दायित्व तसेच रुग्णसेवा हे ब्रीद सार्थ ठरवत रात्रंदिवस झटणाऱ्या आशा स्वयंसेवीका,गटप्रवर्तक यांचा जि.प.आरोग्य विभागातर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी पार पडलेल्या नारीशक्ती गृप व आशा स्वयंसेवीकांच्या स्नेहमेळाव्यात खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते देऊन आशाताईंचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो प्रदेश युवती सह-संयोजिका अमृताताई पाटील,धुळे यांची उपस्थिती होती.यावेळी नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,भाजयुमो युवती प्रदेश उपाध्यक्षा कु.अमृताताई पाटील,आशा गटप्रवर्तक सौ.निलिमाताई योगेश ढाके,अर्चनाताई सोनवणे व सर्व आशा स्वयंसेवीकांच्या हस्ते पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आशा स्वयंसेवीका,गटप्रवर्तक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button