Dhule

कोरोना संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठकीकडे पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ धुळे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर.

कोरोना संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठकीकडे पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ धुळे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर.

धुळे : धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांना धुळे जिल्ह्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीबाबत गांभीर्य नसल्याचा आरोप धुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रतिनिधींनी केला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात समाजातील विविध घटकातील मंडळींना कोरोनाचा अटकाव करण्याबाबत चर्चेसाठी महत्त्वपूर्ण बैठकीला बोलावण्यात आली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार होती. मात्र जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रतिनिधी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा नियोजन सभागृहात येऊन बसले होते, मात्र दीड तासानंतर निरोप आला की, त्यांना अजून एक ते दीड तासांनी बैठक सुरू होऊ शकते असं पोलीस प्रशासनाकडून सांगितले गेल.

एकंदरीत ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रतिनिधींनी सभागृह सोडून जाणे पसंत केले. या वेळी काँग्रेसने प्रशासनाला दोष दिला तर भाजपने पालकमंत्र्यांच्या बेजबाबदारपणा ला दोषी ठरवलं. लोकांना बोलून घ्यायचं आणि कोरोना सारख्या गंभीर विषयावर चर्चा न करता आमदारांकडे जाऊन बसायचं असा आरोप भाजपने केला. पालकमंत्री प्रत्येक वेळेस तासन् तास प्रतीक्षा करायला लावत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

Byte – श्याम सनेर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Byte- हिरामण गवळी, भाजप. अझर पठाण धुळे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button