Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात बी व्होक कोर्सेसला प्रवेश देणे सुरू

धनाजी नाना महाविद्यालयात बी व्होक कोर्सेसला प्रवेश देणे सुरू

फैजपूर प्रतिनिधी

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव

येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात बी व्होक कोर्सेससाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीचे ऑनलाइन प्रवेश देणे सुरू झाले आहे.

केमिस्ट्री इन इंडस्ट्री अंड अनालीटीकल टेक्निक, एग्रीकल्चर / ग्रीन हाउस मॅनेजमेंट, ई अकाउंटिंग अँड ई टॅक्ससेशेन असे तीन नाविन्यपूर्ण कोर्सेस सुरू झाले असून त्यांच्यासाठी इयत्ता बारावी, डिप्लोमा इन इंजीनियरिंग व एमसीव्हीसी अशी पात्रता अट ठेवण्यात आली आहे. यासोबत ई अकाउंटिंग अँड ई टॅक्ससेशन साठी आयटीआय ही पात्रता सुद्धा चालू शकेल असे केंद्रप्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी कळविले आहे. या तीनही कोर्सचे नोडल ऑफिसर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ अनिल भंगाळे हे असून प्रोग्राम कॉर्डिनेटर म्हणून डॉ हरिष तळेले, डॉ नीतीन चौधरी, प्रा एन एच वायकोळे, प्रा आर डी तळेले, प्रा एस पी मगर व डॉ रवी एन केसूर हे असून महाविद्यालयाच्या ऑनलाइन पोर्टल वर संबंधित विषयाचे प्रवेश देणे सुरू झाले आहे असे कळविण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टल वर जाऊन लवकरात लवकर नोंदणी करावी अथवा संबंधित समन्वयकांना संपर्क साधावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button