Maharashtra

धरणगाव नगरपालिका कर्मचारीला कोरोनाची लागण

धरणगाव नगरपालिका कर्मचारीला कोरोनाची लागण

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेचा कर्मचारीला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे. तथापि, संबंधित रुग्णाचा परिसर सील करण्यात येत आहे.

संशयित रुग्णाला (दि.१३ मे) रोजी न्युमोनियाची लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, आज संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून या वृत्ताला तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दुजोरा दिला आहे. नगरपालिका कर्मचारी वास्तव्यास असलेला परिसर धरणगाव तालुका प्रशासनातर्फे सील करण्याचे काम सुरू आहे. धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ११ वर पोहचला आहे. यापैकी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यापैकी ८ रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. तर एक रूग्णावर उपचार सुरू होते. नागरीकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन नगरपालिका व तालुका प्रशासनाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button