Maharashtra

पंढरपुरातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मनसेकडून धान्याचे वाटप

पंढरपुरातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मनसेकडून धान्याचे वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर, कोरोना व्हायरसमुळे अनेक गरीब कुुटुंबे अडचणीत आली आहेत. उद्योग व्यवसाय बंद असल्याने रोजगार ही ठप्प झाला आहे. त्यामुळे हातावरचे पोट आणि रोजगार करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी मनसे अन्नपूर्णे सारखी मदतीला धावून आली आहे. शहरातील झेंडे गल्ली भागात राहणाऱ्या गरीब व गरजू लोकांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांच्या हस्ते मदतीचे वाटप केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश आणि राज्यात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः शहरातील मजूर आणि स्वयंरोजगार करणारे लोक अडचणीत आले आहेत. गेल्या महिन्याभरापासून सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक नाकेबंदी झाली आहे. अशा संकटाच्या काळात अनेक गरीब कुटुंबे मदतीच्या प्रतिक्षेत होती. त्यांची हीच वेळ आणि गरज ओळखून मनसेचेे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी झेंडे गल्लीतील गरजू व गरीब लोकांना गव्हू,तांदुळ, साखर, चहा पावडर अशा जीवनावश्यवक वस्तूंचे मोफत वाटप केले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार,अर्जून जाधव, सागर घोडके, ओंकार कुलकर्णी, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button