समाजाचे देणे समजून मेगाफाईन कडुन लखमापूरला विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता ग्रुहाचे लोकार्पण
सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
ज्या परिसरात आपण उद्योग व्यवसाय करतो त्या परिस्थितीत लोकांचे आपण काहीतरी देणं लागतो याभावनेतून लखमापूर येथील मेगाफाईन फार्माकडून कादवा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वछतागृह बांधून दिले असल्याचे प्रतिपादन मेगाफाईन फार्माचे व्यवस्थापकिय अघिकारी विजय गोवर्धने यांनी केले
मेगाफाईन फार्माचे संचालक हसमुख गांधी प्रफुल्ल सोनी व्हा चेअरमन दिपाली बैजु ह्याच्यासारखी सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं असून ज्या ठिकाणी सर्व गावातील मूल शिकतात त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून त्यानी विद्यालयास उत्तम सुविधा असलेले स्वछतागृह बांधून दिले असून , त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीरामजी शेटे, माजी प्राचार्य के के अहिरे, शिवाजी दळवी,निंबा आप्पा देशमुख व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले कादवा इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेजमध्ये, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून मेगाफाईन फार्माने बांधून दिलेल्या स्वछतागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थितांमध्ये शिवाजी दळवी,दगुजी सोनवणे, माजी सरपंच सुभद्रा देशमुख ज्योती देशमुख, मंगला सोनवणे बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आबा देशमुख,अरुण देशमुख, प्रवीण देशमुख,,, आदींसह शिक्षक मोजके पालक उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य पी एन पाटील यांनी कोविड योद्धा ग्राम विकास अधिकारी संजय पाटील तलाठी नंदकुमार गोसावी , आदींचा शालेय समिती अध्यक्ष निंबा आप्पा देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,माजी सरपंच मंगलाताई सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून, सलाम बॉम्बे फाउंडेशन च्या वतीने आलेल्या कोरोना किटचे वाटप केले, सूत्रसंचालन जोंधळे पी एम यांनी केले .






