Jalgaon

? जळगांव LIVE… जळगांव मध्ये  Delta Plus ची एन्ट्री…

? जळगांव LIVE… जळगांव मध्ये Delta Plus ची एन्ट्री…

जळगांव : जळगाव जिल्ह्यातील ७ रुग्णांच्या नमुन्यांमध्येही हा व्हेरिएंट सापडला. हे सर्व रुग्ण हे एकाच भौगोलिक क्षेत्रातील आहेत. हे क्षेत्र ग्रामीण भागात मोडते. नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर संबंधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेची मदत घेऊन तातडीने रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या व्हेरिएंटमुळे त्या क्षेत्रात पॉझिटिव्हिटी वाढली नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या एकूण पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणेच त्या क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेटही १.२१ टक्के इतका आढळला आहे. त्याचवेळी मृत्यूदरही वाढलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, मस्क्, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ही ञिसुञी पाळा असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button