आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या पाठपुराव्याला यश चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नवीन रुग्णवाहिका मंजूर
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : आज आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रयत्नामुळे चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे नवीन रुग्णवाहिका मिळाली असून यामुळे चांदवड व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत व चांदवड परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सेवेत अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आमदार डॉ.आहेर यांची होती. त्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले आहे.
आज मा.नगराध्यक्ष श्री.भूषण कासलिवाल यांच्या हस्ते रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. कोरोनाच्या तिसरी दुसरी प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.अशा संकटसमयी आरोग्य सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे.
यावेळी अधीक्षक डॉ.सुशील शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, डॉ.सोनवणे, डॉ.जीवन देशमुख, डॉ.शरद चव्हाण, वाहनचालक विशाल मोरे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.






