Maharashtra

चिमूर तालुक्यातील सलून व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा

चिमूर तालुक्यातील सलून व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा
नगाजी महाराज नाभिक समाज सेवा समिती यांची मागणी
मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार यांना निवेदन

प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

नाभिक समाजात ६०% समाज हा सलून या व्यवसायात असून लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यात सोशल डिस्टनसिंगमुळे सलून व्यवसाय पूर्णतः बंद आहे, त्यामुळे सलून व्यावसायिक व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून सलून कारागिरांसाहित सलून व्यावसायिकांना शासनाकडून आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूरच्या वतीने मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे(म रा)यांना चिमुरचे तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले.
संपूर्ण देशासाहित राज्यातही कोरोना रोगाच्या महामारीने थैमान घातल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीला थांबविण्यासाठी संपूर्ण देश २२ मार्च पासून पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊन मधे वाढ केलेली आहे
शासनाने लॉकडाऊन मधे फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यवसाईकांनाच सीमित वेळेत सोशल डिस्टनसिंग च्या अटीवर व्यवसाय करण्यास सांगितले आहे; मात्र सलून व्यावसायिक जीवनावश्यक यादीत येत नसल्याने व सोशल डिस्टनसिंग ठेवू शकत नसल्याने त्यांची दुकाने पूर्णतः बंद आहेत, ६०% समाजबांधवांचा मुख्य व्यवसाय हा सलून व्यवसायावरच आधारित असल्यामुळे हातावर कमावून पानावर खाणारा व्यवसाय असल्यामुळे दररोज मिळेल त्या पैशातून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करतात परंतु त्यांचा पोटभरणीचा व्यवसायच बंद असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे,त्यामुळे शासन स्तरावर सर्वे करून गरजू नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शासनाकडून करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती चिमूर च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धव ठाकरे यांना चिमुरचे नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांचे मार्फत सेवा समितीचे अध्यक्ष देवेंद्र उद्धवजी कडवे यांचे हस्ते देण्यात आले, असेच निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, चिमुरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनाही देण्यात आले यावेळी सचिव अरुण चिंचुलकर,जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक सदस्य सुधीर पंदीलवार,रामदास मांडवकर, श्रावण कडवे,सूरज पुंड आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button