Bollywood

Bollywood:एक लडकी भिगी भागीसी…! शापित आरस्पानी सौंदर्य.. मधुबाला यांचा आज स्मृतिदिन..!जाणून घेऊ या सौंदर्यवतीची सुपरहिट कारकीर्द..!

Bollywood:निरागस चंदेरी दुनियेतील सोनेरी स्वप्न..एक्सप्रेशन क्वीन मधुबाला यांचा आज स्मृतिदिन..!जाणून घेऊ या सौंदर्यवतीची सुपरहिट कारकीर्द..!

एक अभिनेत्री जी तिच्या केवळ अबोल राहून बोलायची. शब्दांविना केवळ आपल्या हावभावातून मनातल्या सगळ्या भावभावनांना पडद्यावर आकार द्यायची. जिच्या नावापुढे फक्त सुपरहिट हाच शब्द चपखल बसतो. ती अभिनेत्री म्हणजे मधुबाला (madhubala). चंदेरी जगाला पडलेलं एक सोनेरी स्वप्न… मधुबालाच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी शब्द कितीही आखीव रेखीव असले तरी ते अपुरे पडतील. पण ह्या आरस्पानी सौंदर्याला होता शाप… आज मधुबाला यांचा स्मृतीदिन. त्यामुळे त्यांच्या सुपरहिट कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न…

दिल्लीत बालपण

अताउल्लाह खान आणि आयेशा बेगम यांच्या घरात 14 फेब्रुवारी 1933 ला एक हिरा जन्माला आला ज्याचं नाव मधुबाला. लहानपणापासूनच मधुबाला यांना चित्रपट बघण्याचा छंद होता. तेव्हापासूनच त्या चंदेरी दुनियेचा भाग होऊ इच्छित होत्या. पण त्यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. पण हळूहळू त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी मधुबाला यांना पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिला. आणि वयाच्या केवळ सातव्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवर त्यांनी काम केलं.

बॉलिवूडमध्ये प्रवेश..

मधुबाला यांनी बसंत या चित्रपटात 1942 साली काम केलं. हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यांच्या पहिल्या सिनेमातील कामाने अनेकांना प्रभावित केलं. तिथून पुढे मधुबाला यांना कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढे त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केलं. अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद या सुपरहिट कलाकारांसोबत त्यांनी मोठा पडदा गाजवला.

सुपरहिट सिनेमे

मधुबाला म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो ‘मुघल-ए- आझम’ हा सुपर-डुपर हिट सिनेमा. यातली अनारकली आजही मनातच्या कोपऱ्यात अलगद घर करते. याशिवाय मुमताज महल, दिल की राणी, नीलकमल, अमर प्रेम, दौलत, दुलारी,हाफ तिकीट, हँसते आसू, बेकसूर, बादल, खजाना, अरमान, काला पानी, हावडा ब्रिज, बरसात की रात, महलों के ख्वाब, हाफ टिकट, शराबी, ज्वाला यासारख्या 73 सिनेमात त्यांनी काम केलं. ज्यातले अनेक सुपरहिट झाले.

सुपरहिट गाणी

एक लडकी भिगी भागी सी, आइये मेहरबान,प्यार किया तो डरना क्या, हाल कैसा है जनाब का, अच्छा जी मै हारीं या सारखा सुपरहिट गाण्यांचा मधुबाला चेहरा होत्या. मधुबाला यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी गाण्यांना अधिक अर्थपूर्ण बनवलं.

अखेर पर्यंत किशोर कुमार यांची साथ..

एककाळ असा होता जेव्हा लाखो लोकं मधुबाला यांचे चाहते होते. मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव होतं. त्याचबोरबर किशोर कुमार हे संगीत विश्वाचे बादशहा होते. दोघांची लव्हस्टोरी खूप सुंदर होती. ज्याचा शेवट मधुबाला यांच्या मृत्यूने झाला. मधुबाला आणि किशोर कुमार यांचं लग्न झालं तेव्हा मधुबाला बॉलिवूडच्या सुपरस्टार बनल्या होत्या. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयात छिद्र असल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र किशोर कुमार यांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या दोघांचे परिवार कधीच त्यांच्यासोबत नव्हते. अभिनेत्रीच्या परिवाला लग्नासाठी तयार करण्यासाठी किशोर कुमार यांनी त्यांचं नाव आणि धर्म देखील बदलला होता. अखेर मधुबाला आणि किशोर कुमार यांच्या प्रेमापुढे प्रत्येकाला झुकावं लागलं आणि या दोघांनी लग्न केलं.
मात्र किशोर कुमार यांच्या घरच्यांनी अभिनेत्रीला कधीच एक्सेप्ट केलं नाही. मधूबाला यांची ट्रिटमेंट सुरु होती. मात्र तरीही त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. मिडिया रिपोर्टनुसार, किशोर कुमार यांनी आपली पत्नी मधूबाला कधीच एकट सोडलं नाही. मधूबाला ९ वर्ष आपल्या आजाराला झुंज देत होत्या. किशोर कुमार यांनी प्रत्येक दिवशी मधूबाला यांना मृत्यूशी झुंज देताना पाहिलं होतं.
एका मुलाखतीमध्ये बोलताना किशोर कुमार म्हणाले की, ”प्रत्येक क्षणाला एक्टिव्ह असणारी मधूबाला आराम करुन-करुन फ्रस्टेट झाली होती. मी प्रत्येक क्षणाला तिला हसवायचा प्रयत्न करायचो. मला डॉक्टरांनी असं करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी असंच करत राहिलो. जेव्हा ती हसायची मी पण खूप हसायचो जेव्हा ती रडायची मी पण खूप रडायचो. ९ वर्ष मृत्यूला झुंज दिल्यानंतर मधूबाला यांचं 23 फेब्रुवारी 1969 मध्ये निधन झालं.

Bollywood:एक लडकी भिगी भागीसी...! शापित आरस्पानी सौंदर्य.. मधुबाला यांचा आज स्मृतिदिन..!जाणून घेऊ या सौंदर्यवतीची सुपरहिट कारकीर्द..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button