Maharashtra

गट ग्रामपंचायत चांपा तर्फे ३ हजार५०० झाडे लागवडीचा विक्रमी संकल्प

गट ग्रामपंचायत चांपा तर्फे ३ हजार५०० झाडे लागवडीचा विक्रमी संकल्प 

गट ग्रामपंचायत चांपा तर्फे ३ हजार५०० झाडे लागवडीचा विक्रमी संकल्प


चांपा प्रतिनिधी अनिल पवार 
झाडाविना ढग गेले!_ _ढगाविना पाणी गेले!_ _पाण्याविना शेती गेली!_ _शेतीविना समृद्धी गेली!_ _समृद्धीविना सारे हवालदिल_ _झाले_ ! _ईतके सारे अनर्थ वृक्ष_ _तोडण केले! निसर्ग हा म्हणून  कोपला! त्याची जाणीव ठेवा! त्यासाठीच संदेश हा! झाडे लावा झाडे जगवा! हा संदेश देत  गट ग्रामपंचायत चांपा येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सोमवार दि०७ /०७ /२०१९ ला सकाळी ११ वा. विजय विद्यालय व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी काढण्यात येणार आहेत . 
झाडाचे महत्व लोकांना पटवून देणे. झाडाचे रोपट्याचे लागवड करणे. राज्य शासनाच्या ३३कोटी वृक्ष लागवडीसाठी चांपा ग्रामपंचायत तर्फे विक्रमी ३५०० झाडे लावण्याचे संकल्प सरपंच यांच्या पुढाकाराने केला असून सर्व झाडांचे संगोपन नरेगा योजनेंतर्गत करणार असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी सांगितले. त्यामध्ये १८०० झाडे ग्रामपंचायतीने लावायची आहेत.तर १७०० फळांची झाडे ग्रामस्थांना वाटायचे आहेत. व प्रत्येकाने ते झाडे आपल्या घरी लाऊन जगवायचे आहेत. 
मंगळवार दिनांक ०९/०७ /२०१९ ला सकाळी ११ वा उत्तर उमरेड वनपरीक्षेत्र अधिकारी ए. मडावी सर यांचे महाराष्ट्र सरकार वनविभागामार्फत राज्यशासनाने 33 कोटी वृक्ष लागवड संकल्प या विषयावर मार्गदर्शन व वनविभागच्या जागेवर वृक्ष रोपण करण्यात येईल. यासाठी गावातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले . 
              

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button