Amalner

मी सर्व मतदार बंधू भगिनींचा आभारी आहेमतदारांच्या हृदयात राहतो आणि राहील… कार्यसम्राट शिरिषदादा चौधरी

मी सर्व मतदार बंधू भगिनींचा आभारी आहेमतदारांच्या हृदयात राहतो आणि राहील… कार्यसम्राट शिरिषदादा चौधरी

अमळनेर विधानसभा क्षेत्रात भूतो न भविष्यती असे विकास कार्य मी करू शकलो आणि त्या कार्याला पाहूनच ज्या मतदारांनी मला भरघोस मतदान केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवमहाराष्ट्र निर्मितीच्या कार्यक्रमाला मतपेटीतून ज्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला; त्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रथमतः मी आभार मानतो. या मतांचा आणि त्याद्वारे माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी आदर करतो आणि आपले एकही मत वाया जाऊ न देता माझे विकास कार्य असेच जारी ठेवीन, आपले सेवा चालू ठेवीन; असे आपणास वचन देतो.
सद्या सोशल मीडियातून तसेच काही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून माझ्या पराभवाविषयी विविध तर्क-वितर्क लावले जात असल्याचे पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. परंतू माझ्या पराभवाची कारणमीमांसा करतांना काही मुद्दे विचारात घेतली जायला हवेत असे मला वाटते. पहिला मुद्दा हा की मतदारसंघातील मतदारांमुळे मी अपयशी झालेलो नाही. खूप बरे वाटले मी निसटता हारलो .. मात्र गाव विकासासाठी ज्याने दिवस-रात्र एक केले त्याचा पराभव झालाच कसा? असा संतप्त प्रश्न करीत निकालानंतर असंख्य माता भगिनींनी अश्रू ढाळत केलेल्या आक्रोशातून, गावा-गावातील मुलांनी भर दिवाळीतही फटाके फोडणे टाळून व्यक्त केलेल्या दुःखातून, टायगर जिंदा है च्या घोषणा देत टाहो फोडणाऱ्या हजारो तरुणांनी केलेल्या शोकसंतापातून… आणि निकाल पाहून आत्महत्या करावीशी वाटते सांगत रडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोशातून …. आमचा पराजय झालेला नाही हेच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रुपात दिसून आले. अमळनेर आणि नंदुरबार अशा दोन्ही तालुक्यात हेच वातावरण होते. या दोन्ही तालुक्यातील लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी अश्रू पाहून, या दोन्ही तालुक्यातील माझ्या आया-बहिणी माझ्यासाठी रडतांना पाहून, माझ्यासाठी धावून येत माझा तरुणवर्ग मलाच धीर देतांना पाहून खात्रीपूर्वक जाणवले की, मी हारलेलो नाही ! मी ह्या माझ्या तरुणांच्या हृदयात; माझ्या माता-भगिनींच्या भावभिजेच्या तबकातील दिव्यात, गरिब-सामान्यांच्या आशेची ज्योत बनून बसलो आहे आणि हीच भाऊबीजेची सर्वात मोठी मिळालेली भेट आहे, जनतेचे हे प्रेम हा विश्वास हीच माझी सर्वात मोठी कमाई मी गेल्या पाच वर्षात कमावली आहे !
म्हणून मला येथे सांगावेसे वाटते कि माझ्या अपयशाला माझ्यावर इतके प्रेम करणारा मतदार कारणीभूत असूच शकत नाही. ठोस विकासाच्या मुद्द्यावर आमचे विरोधक लढले असते तर निश्चित विजय आमचा होता. परंतु काही ठिकाणी झालेले कट-कारस्थान, त्यातून भाजपाविरोधी पक्षाला मिळालेले बळ आणि जातीपातीचे विष कालवून मतदारांची केलेली दिशाभूल या बळावर विरोधी उमेदवाराला विजय मिळवावा लागला; हा एक प्रकारे आमच्या विरोधी उमेदवाराचा मोठा पराजयच आहे. म्हणूनच आज मला अभिमान आहे माझ्या गावातील कार्याचा..! आज मला अभिमान आहे माझ्या गावातल्या तरुणांसाठी केलेल्या रोजगार निर्मितीचा..!
आज मला अभिमान आहे 15 हजार ते 40 हजार रुपया पर्यंत दरमहा कमाई करणारे तरुण तरुणींना स्वतः च्या पायावर उभे करू शकलो याचा.. !
आज मला अभिमान आहे अंमळनेरमधे येणारा प्रत्येक अतिथी आता प्रथम शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पहायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याला भेट द्यायला येतात याचा..!
आज मला अभिमान आहे आम्ही जेव्हा हे पूर्णाकृती पुतळे बनवून शहरात आणले आणि त्याची भव्य मिरवणूक काढली तेव्हा पक्षीय राजकारण आणि द्वेष बाजूला ठेवून आम्ही सर्व पक्षाच्या शहरातील मान्यवरांना मोठ्या मानाने निमंत्रित केले होते. परंतु तेव्हा व्यक्ती द्वेष कायम ठेवून ते कोणीच आले नव्हते. परंतु आज त्याच पूर्णाकृती पुतळ्यावर जाऊन अनिलभाऊ जिंकून आल्यावर हार टाकायला गेले; याचा.. ! मला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा उभारून बौद्ध बांधवांच्या भावनांना न्याय दिल्याचा …! आज मला अभिमान आहे आम्ही बांधलेले अद्यावत नाट्यगृह कलाकार वापरताहेत याचा…!
आज मला अभिमान आहे, आमच्या नवनिर्माणातून बनलेल्या इमारतीत नगरपालिकाचा कारभार चालत असल्याचा..!
आज मला अभिमान आहे, मंगळग्रहा सारख्या प्रसिद्ध स्थळाला सर्व सुविधांसाठी पाच कोटी रुपये निधीतून साकारण्यात येत असल्याचा..! मला अभिमान आहे, संत सखाराम महाराज मंदिर भक्त निवास इमारत 1.50 कोटी निधीतून उभारली जात असल्याचा..! मला अभिमान आहे, कपिलेश्वर मंदिर येथे भक्त निवास साठी साठी 2 कोटीच्या निधीतून इमारत साकारत असल्याचा…!
या मतदारसंघासाठी इतके निधी आणले आणि ईतक्या प्रकारचे विकासकाम केले की, आचारसंहितेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी कामांचे म्हणजे विकासाचे नारळ फोडत होतो. कारण सुविधांचा प्रचंड अभाव असलेल्या या गावाला आणि तालुक्याला प्रगतीपथावर आणणे; हे एकच ध्येय अर्जुना प्रमाणे माझ्या डोळ्यासमोर होते. त्यामुळेच अनेक लोक मला भेटायला येऊन सांगायचे की, पहिल्यांदाच आमच्या आयुष्यात अमळनेर मतदारसंघात एवढे जाडीचे (गुणवत्तेचे) रस्त्यांचे जाळे पाहिले, ईतकी विकास कामे झाल्याचे पाहिले. तरुणांच्या हाताला काम मिळावे, शेतकऱ्यांना त्याच्या परिश्रमाचा मोबदला मिळावा आणि त्यात येणार्‍या अडचणी सोडवाव्या यासाठी मी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला. माझ्या कुटुंबियांच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजार मुला-मुलींनी रोजगार उपलब्ध करून दिला. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे राजकीय मार्गदर्शक माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळेच आम्हाला सर्वकाही करणे शक्य झाले म्हणून आम्ही त्यांचे पण जाहीर आभार मानतो. पक्षातील या बळावरच मी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणले. 53 व्यायामशाळा इमारत पासून तर गावागावात रस्ते, स्मशानभूमी, 59देवमढी, 35 ग्रामपंचायत, 12 गावदरवाजे, 72 सर्व समाजासाठी सामाजिक सभागृह अशी 1400 कोटींचे भरीव विकास कामे मी अमळनेर मतदार संघात आणली.
मोठ मोठी ऑपरेशन्स मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून मोफत करून दिली . 7000 हून अधिक माता भगिनींना दरमहा पगार चालू करून दिले.
विप्रो सारख्या उद्योगाला स्वतः जाऊन विनंती करून बंद पडत असलेला अमळनेरचे युनिट पुनर्जीवित करण्यास भाग पाडले.
परंतु या ठिकाणी असेही नमूद करतो कि केवळ स्वार्थासाठी भाजपामध्ये घुसलेले परंतु प्रत्यक्षात विरोधी पक्षासाठी काम करणारे पदाधिकारीच पक्षाला घातक ठरले. काहीजणांनी राजकीय ईर्षेतून आमच्याा विरोधी उमेदवाराला साथ दिली. आणि आज उलट गिरीश भाऊ महाजन यांना दोष लावणाऱ्या चर्चा ते पसरवित आहेत. या घरभेदी लोकांना आमचे जाहीर आव्हान आहे की, त्यांनी आपल्या कामाचे हिसाब किताब प्रामाणिकपणानेेे मांडून दाखवावे. अन्यथा स्वतः गिरीश भाऊ महाजन त्यांचे प्रत्येक पान उघडल्याशिवाय राहणार नाही. गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्यात आणि प्रयत्नात कोणताही दोष नव्हता, हे आमचे म्हणणे आहे.
वास्तविक केल्या गेलेल्या एका गुप्त सर्वेक्षणातून मी अपक्ष लढलो तरच विजयी होईन, असे मला सांगण्यात आले होते. परंतु वर्षा नू वर्षे रखडलेले पाडळसरे धरणाचे काम पक्षात राहूनच पूर्ण करता येईल, याची खात्री होती आणि जनतेच्या हितासाठी पक्षाकडून लढण्याचा माझा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न होता . स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडून धरणाविषयीचा शब्द मिळाला होता.त्यामुळे मी पक्षाकडून लढलो. माननीय गिरीषभाऊंना कोणीही दोष देऊ नका. त्यांच्यामुळे मला मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनीच मला आत्मविश्वास दिला होता की, तुझ्या सारखा धाडसी कार्यकर्ता माझ्या सोबत असला तर पाडळसरे धरणाला वेगवेगळ्या ठिकाणाहून लागणारा निधी आणता येईल. मग त्यात त्यांचं काय चुकलं? पाडळसरे धरणासाठी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज होती , मग तरीही पराजय का व्हावा? आमच्या विरोधकांनी प्रचार चालवला आहे की माझा राजकीय वध गिरीश भाऊंनी केला. हा चुकीचा प्रचार करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला? मंत्र्यांसमक्ष पक्षातील लोकांना मारहाण केल्याची चूक ज्यांनी केली, त्यांना ती भोवली आणि त्यांचे तिकीट पक्षाने कापले; मग त्यात माझा दोष आहे तरी काय? .. एकीकडे माझे लोक विकासाचे कार्य चालू होते आणि दुसरीकडे येथील पक्षातील काही लोक जाहीरपणे देवाची शपथ घेऊन आम्हाला पराभुत करण्याची विकृत भूमिका निभावत होते….पक्षातील अशा विघ्नसंतोषी लोकांमुळेच पक्षाला आणि पर्यायाने मला अपयश सोसावे लागले यात माझ्या कमतरतेचा प्रश्न येतो कुठे?.. “पक्षाहून मी श्रेष्ठ” हा अहंकार गेल्या 3 वेळा भाजपच्या नाशाचे कारण होतंय.. स्वतःला वाचवण्यासाठी तात्पुरता पक्षात प्रवेश घेणाऱ्या काही नाटककारांमुळे पक्ष मागे पडतोय…ह्यांच्या स्वतःच्या गावात देखील हे पक्षासाठी मत मागू शकले नाहीत. ह्या नाकर्तापणामुळे पक्ष हरतोय. स्वतःचा नाकर्तेपणा लपवून गिरीषभाऊंवर खापर फोडण्याचा प्रयत्न या नाकर्त्यांनी करू नये…. जातीपातीचे राजकारण करीत तरुणांमध्ये जातीअभिमानाची विकृती पसरवून दुहीच्या कुबड्या अनिल पाटील यांना घ्याव्या लागल्यात.. त्याउलट आम्ही फक्त आणि फक्त विकासाचे आणि माणुसकीचे नाते जपणारे राजकारण केले.. अनिल पाटील यांनी तात्पुरत्या वापरलेल्या कुबड्याच्या आधारांवर नाचू नये व चौधरी बंधूंना आम जनतेसमोर धमकी देण्याचाही प्रयत्न करू नये. लोकांना हक्क मिळवून देण्याच्या आमच्या कामाला गुंडगिरी संबोधणारे अनिल पाटील स्वतः गुंडगिरीचा आधार घेतात. नगरपालिका निवडणुकीतील त्यांनी घडवलेल्या गुंडगिरीचे प्रदर्शन अद्याप लोक विसरलेले नाहीत. सत्ता तूमच्या हातात आली आहे तर लोकांच्या सेवेसाठी वापरा; गुर्मी दाखवण्यासाठी वापरू नका, हे आमचे त्यांना जाहीरपणे सांगणे आहे. माझी सर्वांना विनंती आहे की मला लाभलेला माननीय गिरीश भाऊंचा आशीर्वाद आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष प्रेम यामुळे मला 1400 कोटी आणून विकास घडवता आला. अजून भविष्यकाळात खूप विकास घडवायचा आहे आणि आणखी बराच काही घटनाक्रम घडवायचा आहे.
अमळनेर मतदारांचे स्वप्नं भंग करणाऱ्या विरोधी पक्षाच्या श्रेष्टींना जाहीर आव्हान देतो की, आता माझ्यापेक्षा जास्त निधी आणून दाखवा ! आणि आमच्या पेक्षाही अधिकचा विकास घडवून दाखवा !
आज मी हारूनही जिकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे, एवढेच पुन्हा नमूद करतो.
———————-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button