?️ Big Breaking….मद्य खरेदीसाठी ऑनलाईन टोकन सुविधा उपलब्ध
मुंबई | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉपमध्ये होणाऱ्या गर्दी पासून सुटका व्हावी आणि कोव्हिड -19 या अर्थात करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आता इ टोकन सुविधा उलब्ध केली आहे.
?? ही आहे लिंक http://www.mahaexcise.com
या संकेत स्थळावर ऑनलाईन टोकन सुविधा सुरु करण्यात आली आहे. हा निर्णयसध्या पुण्यातपुरता मर्यादित आहे. मुंबईबाबतचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचं आहे .त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल.त्या यादीवर दुकाना समोर क्लीक करायचं आहे.. त्यानुसार घरपोच सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.यामुळे तळी राममानां दिलासा मिळाला आहे.






