Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात फिट इंडिया अभियानांतर्गत वेबिनार चे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात फिट इंडिया अभियानांतर्गत वेबिनार चे आयोजन

सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत वेबिनार चे यशस्वी आयोजन करण्यात आले. केंद्र सरकार पुरस्कृत फिट इंडिया अभियानाला डी जी एन सी सी दिल्ली यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन देशभरातील पंधरा लाखाहून अधिक कॅडेट च्या उस्फुर्त प्रतिसादाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्यदायी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र पोहचविण्याचा संकल्प केला.

त्यानुसार 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर व धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करून फिट इंडिया अभियानाचा उद्देश आणि आणि त्यानुसार करावयाची कार्यवाही यावर सविस्तर माहिती दिली. यात एनसीसी सी यूनीट च्या पंचेचाळीस कॅडेटसने सक्रियपणे सहभाग नोंदवून दिनांक 15 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर दरम्यानच्या अभियानाला यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग दिला आहे. या अनुषंगाने दैनंदिन जीवनात व्यायाम, योगा आणि आहार याला महत्वाचे स्थान देऊन स्वतःसोबत परिवारात व सभोवतालच्या कुटुंबांनाही प्रेरित करण्यात येत आहे.

यासोबत एनसीसी कॅडेटस व्यायामाच्या विविध प्रकारांवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत फिट इंडिया अभियानाची संकल्पना पोहचवीत आहेत. या उपक्रमाचे कौतुक तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्याकडून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button