Amalner:फापोरे ग्रामपंचायत व कल्याणी महिला दूध डेअरी तर्फे लंपी लसीकरण शिबीर संपन्न..
अमळनेर तालुक्यातील फापोरे ग्रामपंचायत व कल्याणी महिला दुध डेअरी आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लंपी आजाराचे लसीकरण शिबिर झाले. या शिबिरात गावातील ५०० गुरांना लसीकरण करण्यात आले.
पक्षुवेद्यकीय दवाखाना श्रेणी – २ जानवे येथील डॉ. थोरात व त्यांची टीम तसेच गावातील सरपंच ललीता एकनाथ पाटील, उपसरपंच दिनेश वसंत पाटील, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी सरपंच जितेंद्र
पाटील, माजी चेअरमन जे . एस . पाटील, माजी चेअरमन भालेराव पाटील, माजी सरपंच प्रताप पाटील इ चे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.






