Nanded

लिंगपिसाट शिक्षकास फाशिची शिक्षा देण्याची मागणी विद्यार्थी व शिक्षक नात्यास काळीमा फासणारी घटना

लिंगपिसाट शिक्षकास फाशिची शिक्षा देण्याची मागणी विद्यार्थी व शिक्षक नात्यास काळीमा फासणारी घटना

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथिल साईबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनीस सांस्कृतीक डान्सचे व्हिडीओ दाखवतो म्हणून बंद खोलीमध्ये अश्लील व्हिडीओ व फोटो दाखवुन शिक्षकाने जबरी संभोग केला. या प्रकरणाची कुठे वाचा फोडली तर आईला जिवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या कडुन बाँन्ड कागद लिहुन घेण्यात आले. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलीसात सहशिक्षक सय्यद रसुल दयानंद राजुरे यांच्या सह सत्यघटना आसतानाही दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदिप पाटील, सुरेखाबाई बनसोडे या पाच जणाविरोध्द रामतिर्थ पोलीस ठाण्यात भादवि 376 (ड) 376 (2) एन 50,6,34 भादवि सह 4,6,10,12 लौगिक अंत्याचार अधिनियम 2012 सह कलम 3(1) डब्लु 3 (2 ) व्ही अ.जा 2015 अन्वये रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .लिंगपिसाट शिक्षकास फाशिची शिक्षा देण्याची मागणी विद्यार्थी व शिक्षक नात्यास काळीमा फासणारी घटनासदरिल आरोपी फरार आसुन त्याचा शोध घेवुन सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे तसेच कुंटुबातील अर्थिक बाजु नाजुक असल्याने तात्काळ अर्थिक मदत देण्यात यावी. पिडीत मुलीला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याने शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावा, कुंटुबाचे पुनर्वसन करण्यात यावे, पिडित मुलीच्या आईला शासकीय सेवेत समावुन घ्यावे, पिडित मुलीच्या आईला पोलीस संरक्षण देण्यात यावे इत्यादी मागणीचे निवेदन युवा पँथर तालुका प्रमुख इंद्रजीत डुमने यानी उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button