लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि 38 नगरसेवकांना अपात्र करा…लालबाग शॉपिंग बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केली जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी..
अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न आता पुन्हा पेटला आहे.या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि छोट्या व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.लालबाग शॉपिंग मध्ये व्यापाऱ्यांनी गाळ्यासमोरील जागेत ८ बाय १२ चे पक्के बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवला होता. या ठरावाचे सूचक विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक होते. हा ठराव मंजूर झाल्यानंतर बांधकाम सुरू झाले होते.परंतु या बेकायदेशीर आणि अवैध बांधकाम प्रक्रियेला विरोध करत सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी मा जिल्हाधिकारी यांच्या कडे ह्या बांधकामाला स्थगिती देऊन चौकशी करावी अशी मागणी केली होती.त्यानुसार हे बांधकाम स्थगित करण्यात आले होते.
अनंत निकम यांनी गाळ्यांसमोरील जागा ही वाहन पार्किंग व ग्राहकांच्या येण्याजाण्याची असल्याने व याच ठिकाणी भाजीपाला मार्केट व आठवडे बाजार भरत असल्याने अडथळा निर्माण होईल आणि एक प्रकारे तांत्रिक दृष्टया नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अतिक्रमण करण्यास संमती दिली,अशी तक्रार जिल्हाधिकारीच्या कोर्टात अपील दाखल करून नप अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१) ई नुसार ३८ नुसार अपात्र करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी अमळनेर न प मुख्याधिकारी यांना चौकशी अहवाल मागवला होता.त्यानुसार चौकशी करून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन व्यापार निधीची बचत तसेच स्थावर मालमत्तेची वाढ होईल. त्यानुसार सहाय्यक संचालक नगररचना यांच्या मंजुरीनुसार ठराव करण्यात
आल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यानी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार अर्ज दाखल करून अमळनेर न प लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, नरेंद्र चौधरी, शीतल यादव, नूतन पाटील, संतोष पाटील, राधाबाई पवार, सुरेश पाटील, नरेंद्र संदानशीव, निशांत बानो कुरेशी, मायाबाई लोहरे, सलीम शेख चिरागोद्दीन, सविता संदानशीव, मनोज पाटील, घनश्याम पाटील, अॅड. चेतना
पाटील, विवेक पाटील, कल्पना चौधरी, निशांत अग्रवाल, संजय भिल, संगीता पाटील, आशा बागुल, संजय मराठे, ज्योती महाजन, प्रवीण पाठक, चंद्रकला साळुखे, रामकृष्ण पाटील, राजेश पाटील, कमलबाई पाटील, प्रताप शिंपी, किरणबाई जाधव, रत्नमाला महाजन, देविदास महाजन, रत्ना महाजन, विनोद लांबोळे
यांच्यासह तत्कालीन स्वीकृत नगरसेवक महावीर पहाडे, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील , फिरोज खान पठाण या ३८ नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी निकम
यांनी केली आहे.






