चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाची अभ्यास सहल किल्ले कांचन-मांचन वर संपन्न
उदय वायकोळे चांदवड
किल्ले कांचन – मांचन ( कांचनगड ) खेलदरी / पुरी ता. चांदवड जि. नाशिक येथे स्थित असून आजच्या किल्ले कांचन-मांचन ( कांचनगड ) च्या दुर्गभ्रमंती अभ्यास सहलीत वनस्पती शास्त्राचे संशोधक प्रा डॉ मनोज पाटील यांनी अनेक वनस्पतींची माहिती दिली. अनेक दुर्मिळ वनस्पती आपल्या परिसरात असल्याचे त्यामुळे कळाले.
रानजीरा , कळलावी , काळाकुडा , रानउडीद , अनेक रानभाज्या व वनस्पतींची माहिती सरांकडुन मिळाली. व ब-याच वनस्पती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत त्यामुळे कुठलेही झाड वेली विनाकारण तोडू नये त्यांची पूर्ण वाढ होऊ देणे आवश्यक आहे. कारण झाड-वेलींची पूर्ण वाढ झाल्यानेच फळे फुले व बीज यांतुनच सृष्टीचे चक्र चालते व पून्हा नव्याने ह्या वेली उगतात. आपण असे केले नाही तर उरल्या-सुरल्या वनस्पती देखील नामशेष होऊ शकतात
आजच्या अभ्यास सहलीत ग्रंथपाल श्री संतोष ठाकरे सर आपल्या लहान ५ वर्षाची मुलीगी कु. दिव्या ठाकरे सह सहभागी होत मोठ्या उत्साहाने ही छोटी मुलगी अवघड किल्ला सहज चढली हे विशेष , काही इतिहासाचे विद्यार्थीही सहभागी झाले. शिक्षक श्री प्रशांत सुताने सरांनी या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती दिली.किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेची लुट घेऊन जाताना मोगल सरदार दाऊदखान ईथे आडवा झाला त्यावेळी ऐतिहासिक कांचनबारीची लढाई ईथे झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब-हाणपुर हुन आलेल्या दाऊदखानाचा आगदी समोरा समोरील युद्धात धूळ चारली. असा एक महत्त्वाचा प्रसंग या किल्ल्याच्या पायथ्याशी घडला असल्याचा इतिहास रोमांच उभे करतो.
चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाच्या वतीने अनेक दुर्गप्रेमी नागरीकांना या अभ्यास सहलीत सहभागी होता आले. त्यात प्रामुख्याने शिक्षक प्रशांत सुताने , ग्रामसेवक प्रकाश सुर्यवंशी , प्रा उदय वायकोळे , प्रा डॉ मनोज पाटील , प्रा चांगदेव कुदनर , ग्रंथपाल संतोष ठाकरे , बँक मॕनेजर जितेंद्र डाके , रतन दिवटे, संजय पाडवी , रूद्र डाके , समीर सुताने , मानस कोल्हार , चि. चिन्मय ठाकरे , कु. दिव्या ठाकरे आदींनी या अभ्यास सहलीत सहभाग नोंदवीला.






