लग्न कॅट विक्कीचे..!आणि ड्युरेक्स कंडोम ने केली आगळीवेगळी जाहिरात..!
मुंबई बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांचा राजेशाही विवाह सोहळा ९ डिसेंबर रोजी संपन्न झाला.राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे विकी आणि कतरिना हे विवाह बंधनात अडकले.
ह्या विवाह सोहळ्याला कबीर खान, नेहा धुपिया, अंगद बेदी, शर्वरी वाघ, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक पण मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित होते.
लग्नाच्या नियम आणि निर्बंधांमुळे लोकांनी सोशल मीडियावर अनेक मीम्सही शेअर केले आहेत.तर सलमान व रणबीर कपूर यांच्या वरही मिम्स चा पाऊस पडला. तर त्यात भर म्हणून लोकप्रिय कंडोम ब्रँड ड्युरेक्स इंडियानेही विकी-कॅटच्या लग्नाची एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे.
ड्युरेक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “प्रिय विकी आणि कतरिना, जर आम्हाला आमंत्रित केले नाही तर तुम्ही मस्करी करत राहणार” असे म्हणत स्वतःची उत्तम जाहिरात मात्र ड्युरेक्स ने करून घेतली आहे. कारण विक्की कॅट सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत.त्यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स देखील आहे.






