Maharashtra

अमळनेर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी माजी आ.साहेबराव पाटील यांनी घेतली धाव १५००० रूपयांची केली आर्थिक मदत

अमळनेर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी माजी आ.साहेबराव पाटील यांनी घेतली धाव १५००० रूपयांची केली आर्थिक मदत

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर : संपूर्ण देशाभरात कोरोनाच नाव समोर आले म्हणजे अंगावर काटा उभा राहतो आज त्या आजराने संपूर्ण देशावर बिकट परिस्थिती निर्माण झाली असून कित्येक गोर गरीब उपाशीपोटी असतील याचा काही अंदाज नाही देशभरात सुरू असलेल्या कोरोना अजरामुळे लॉकडाऊन चा फटका आम जनता गरीब,हातमजुर रोजंदारीवर,मोलमजुरीकाम करणाऱ्यांसह सर्व्यांनाच बसला आहे. अशा या बिकट प्रसंगी असलेली अमळनेर येथील देहविक्री करणाऱ्या महिलांनाही सध्या आर्थिक स्वरूपाची अडचणींना सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषि’भूषण साहेबराव पाटील यांनी धाव घेत त्यांना एकूण 15000 रुपयांची आर्थिक स्वरूपाची मदत केली यावेळी त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून रवी पाटील यांच्या हस्ते एकूण75 महिलांना प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी आधार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू प्रसाद,अध्यक्षा भारती पाटील, संजय कापडे, सईदा शेख, अश्विनी सूर्यवंशी, अनिता बडगुजर, फरीदा शेख, यास्मिन शेख, नंदिनी चौधरी, रजू जैन, तोसिफ शेख आदीं उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button