Mumbai

Mumbai Diary: आजच्या कॅबिनेट बैठकीत शिंदे सरकारने घेतले 14 महत्वपूर्ण निर्णय..!पोलीस भरतीसह सातवा वेतन आयोग व इतर…

Mumbai Diary: आजच्या कॅबिनेट बैठकीत शिंदे सरकारने घेतले 14 महत्वपूर्ण निर्णय..!पोलीस भरतीसह सातवा वेतन आयोग व इतर…

Mumbai: महाराष्ट्र गृह विभागाच्या पोलीस शिपाई (Police Constable) संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र गृह विभागाच्या पोलीस शिपाई (Police Constable) संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्यात आली असून एकूण वीस हजार पदे भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पोलिसांची 20 हजार पदं भरणार, चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव; मंत्रिमंडळाचे निर्णय

  • राज्यात फॉर्टिफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार – (अन्न व नागरी पुरवठा विभाग)

  • • राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)

    • नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना – (नगर विकास विभाग)

    • पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार – (गृह विभाग)

    • इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे सुरु करणार – (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

    • इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता 50 विद्यार्थ्यांना मिळणार – (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

    • उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवणार. शिष्यवृत्तीची रक्कम 50 हजारापर्यंत वाढवली – (अल्पसंख्यांक विकास विभाग)

    • वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार – (वन विभाग)

    • राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू – (वैद्यकीय शिक्षण विभाग)

    • दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय – (विधि व न्याय विभाग)

    •महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

    महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

    • एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ –
    (महसूल विभाग)

    • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार – (सामान्य प्रशासन विभाग)

    संबंधित लेख

    Leave a Reply

    Back to top button