श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मतदार जन जागृती अभियानास उस्फुर्त प्रतिसाद
दि. 26/11/2021 रोजी संविधान दिवसाचे औचित्य साधून शहरातील राणी-लक्ष्मी बाई चौकातील अनिल अंबर पाटील शाळेत मतदार जन जागृती अभियाना अंतर्गत मतदारांना समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार श्री. मिलिंद कुमार वाघ, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव अधिकारी श्री. विजयसिंग परदेशी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गौरव माळी यांनी संस्थेची जन आरोग्य योजना व मतदार जागृती या विषयावर आपले मत मांडले. सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे, आधार संस्थेचे अध्यक्षा श्रीमती. भारती पाटील,रेणू प्रसाद यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी चोपड्याचे उपजिल्हाधिकारी श्री.सचिन शिंदे,मुख्यसेविका सौ. सुवर्णा सोनवणे , श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. गौरव महाजन,जयेश माळी, प्रकल्प व्यवस्थापक श्री. विक्रम शिंदे, सानेगुरुजी संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील व शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






