शरदरावजी पवार यांच्या हस्तेकादवाचे आसवनीसह इथेनॉल प्रकल्पाचे शुक्रवारी उद्घघाटन
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी – कादवा सहकारी साखर कारखान्याचे आसवनीसह इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन शुक्रवार दि 10 रोजी दुपारी 03 वाजता, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राहणार असून यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार,पालकमंत्री नामदार दादा भुसे,उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार राहुल आहेर,माणिक कोकाटे, हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीपराव बनकर,राहुल ढिकले, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, दिलीप बोरसे,सरोजताई अहिरे, देवयानी फरांदे,सीमा हिरे, सत्यजित तांबे,किशोर दराडे, मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, शिरीष कोतवाल, रामदास चारोस्कर, धनराज महाले,माजी चेअरमन अँड बाजीराव कावळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील माजी सभापती सदाशिव शेळके, शरदचंद्रजी पवार पतसंस्था व्हा.चेअरमन संजय आप्पा पडोळ, जिप सदस्य भास्कर भगरे, विलास कड,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी सर्व सभासद बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,कार्यकारी संचालक हेमंत माने व संचालक मंडळाने केले आहे.






