Baramati

बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये आढळतात नवीन लक्षणें

बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये आढळतात नवीन लक्षणें

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती- दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णाची संख्या धडकी भरवणारी आहे.कोरोनातून अनेकजण बरेही होतायत.मात्र अशातही कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे.जगभरात कोरोनावर संशोधन केले जात आहे. कोरोनाला परतून लावण्यासाठी त्यावर लस शोधणे,त्याचबरोबर उपचारासाठी इतर पद्धती शोधणे यासाठी संशोधन सुरू आहे.ज्याप्रमाणे लस व इतर उपचार पद्धतीवर संशोधन सुरू असताना, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णामध्ये इतर लक्षणे दिसून येत आहे असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये 71% झाले आहे.कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्यांना अजून नवीन लक्षणे दिसून आली आहेत त्यामध्ये थकवा येणे,श्वास घ्यायला त्रास होणे अशी नवीन लक्षणे आढळुन आली आहेत.त्यामुळे कोणीच घाबरून जायचे नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद मध्ये जाहीर केले.शासन आपल्या सर्वपरीने योजना आखत आहेत त्याचबरोबर कोरोना रुग्णाचीसुद्धा उपचार चांगल्या पद्धतीने होत आहेत फक्त जनतेने शासनाने दिलेल्या अटी व शर्थीचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button