Pune

हर्षवर्धन पाटील यांना महिला शिक्षकांनी बीजबंधन राखी बांधून साजरा केला अनोखा पर्यावरण पूरक वाढदिवस

हर्षवर्धन पाटील यांना महिला शिक्षकांनी बीजबंधन राखी बांधून साजरा केला अनोखा पर्यावरण पूरक वाढदिवस

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी बीजबंधनाची राखी बांधून हर्षवर्धन पाटील यांचा 58 वा अनोखा पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा केला.
बहावा, जांभूळ, बेल, गुलबक्षी, गुलमोहोर, नीलमोहोर, बिटी, काटेसांवर, चिंच, अशोक, सीताफळ, सिताअशोक, रामफळ, बेहडा, अर्जुन, ऐन, सादडा, खैर, शिसम, शिशिर या देशी 158 बीयां एकत्रित करून प्रत्येकी 58 राख्या तयार केल्या असून आज इंदापूर येथील दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यालयाच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापिका कल्पना भोसले, प्राध्यापिका सुवर्णा जाधव, प्राध्यापिका मनीषा गायकवाड यांनी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राखी बांधली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी महाविद्यालयात ऑक्सीजन पार्क माध्यमातून देशी वनस्पतीचे संवर्धन करत असल्याचे सांगितले.
यावेळी सायन्स विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button