Nashik

सुरगाणा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार पोस्को गुन्ह्या अंतर्गत दोघा नराधमाना 20 वर्षाची शिक्षा आणि १३ हजार दंड

सुरगाणा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार पोस्को गुन्ह्या अंतर्गत दोघा नराधमाना 20 वर्षाची शिक्षा आणि १३ हजार दंड

नाशिक/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून. अत्याच्यार केल्या प्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालययाने २०वर्षाचा तुरुंगवास व १३ हजार दंड ठोठावला आहे.तर अपहरण केल्याप्रकरणी दुसऱ्या आरोपीस पाच वर्षांचा तुरुंगवास व दोन हजार दंड ठोठावला आहे. हरीचंद्र नथू गायकवाड(२३) व विलास पुंडलिक चौधरी(२२, दोघे रा.वरभे, ता. सुरगाणा) आशी दोन्ही आरोपी नावे आहे. सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे गेल्या २४जून २०२० ला सायंकाळी घटना घडली होती. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादनुसार,दोघा आरोपीनी १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून चिकाडी शिवार, दिंडोरी तालुक्यातील जउळके,निफाड येतील ओझर सोनेवाडी या ठिकाणी नेऊन २४जून ते ४जुलै २०२० दरम्यान अत्याच्यार केला. अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघानाही अटक करून तपास करीत न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.सरकारी पक्षातर्फे ड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला.त्यांनी सात साक्षीदार तपासले.त्यात दोघांन वर गुन्हा सिध्द झाल्यामुळे न्यायाधिश
डी. देशमुख यांनी गायकवाड व चौधरी दोघानाही शिक्षा सुनावली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button