Nashik

राज्याच्या शैक्षणिक विचार गटात शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर,जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे यांचा समावेश

राज्याच्या शैक्षणिक विचार गटात
शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर,जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे यांचा समावेश

नाशिक : सुनिल घुमरे राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनसाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे अध्यक्षतेखाली विचार गट स्थापन करण्यात आला असून या समितीमध्ये उपक्रमशील अधिकारी, शिक्षकांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर,डाएट चे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात शैक्षणिक सुधारणा,गुणवत्ता विकसन,योजना करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने उपक्रम शील अधिकारी शिक्षक यांचा विचारगट स्थापन करण्यात आला आहे.
या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी तर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्यसचिव पदी प्राचार्य आय टी,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विकास गरड, तर सदस्यपदी, चंद्रपूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, सोलापूर मनपाचे प्रशासन अधिकारी कादर शेख,सिंधुदुर्ग चे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,नाशिक चे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर,औरंगाबाद डाएट चे प्राचार्य कलीमोद्दीन शेख,पुणे चे गट शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे,नाशिक डाएट चे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे,आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्यांनी QR कोड बाबत संशोधन करणारे सोलापूर चे शिक्षक रणजितसिंह डीसले,वाबळेवाडी या प्रसिद्ध आंतराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे,पालघर चे शिक्षक संदीप गुंड,सातारा चे बालाजी जाधव, नांदेड चे सुनील अलुरकर,डहाणू चे आनंदा आनेमवाड,पुणे च्या मृणाल मांजळे, नगर चे रवींद्र भापकर,कराड चे अर्जुन कोळी,वर्धा च्या दीपाली सावंत, अकोले चे भाऊसाहेब चासकर, चंद्रपूर राजेंद्र परतेकी,अमरावती अंकुश गावंडे,कोल्हापूर भगवंत पाटील,हिंगोली दत्तात्रय गुंजकर, औरंगाबाद बापू बाविस्कर,रायगड गजानन जाधव,मुंबई अमरसिंग मगर,शहापूर च्या ज्योती बेलवले आदींचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button