Maharashtra

पेट्रोल भरून घेण्यासाठी दमदाटी शिव पेट्रोल पंप वरील घटना

पेट्रोल भरून घेण्यासाठी दमदाटी शिव पेट्रोल पंप वरील घटना

कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना रिकामे भटकणाऱ्या लोकांवर आळा बसावा या साठी शासना कडून ठोस पाऊल हे वेळीच उललेली असतांना पेट्रोल भरण्यासाठी आता अत्यावश्यक पास शिवाय पेट्रोल भरता यावा या साठी तहसीलदार यांची परवानगीशिवाय पेट्रोल दिला जाणार नाही असे पंप चालकांना आदेश दिल्यावर पंप चालकांन कडून आदेशाचे योग्य पालन होत असताना अमळनेर येथील शिव पेट्रोल पंप येथील पेट्रोल भरावयास आलेल्या दशरथ दिलीप पाटील रा.शनीपेठ अमळनेर याने गर्दीत मी का उभा राहू असे बोलत असताना पंप कर्मचारी भूषण अरुण साळुंखे यास शिवीगाळ करत क्रॉस लाईन तोडून आत टू व्हीलर घालत पंप मशीनच्या जवळ घेत जोराने धक्का बसला दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी न होता मी महावितरण कंपनीत आहे माझ्याकडे ओळख पत्र पण आहे असे बोलत दमदाटी करीत पंप कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत पळ काढला. विचारपूस केली असता संबंधित इसमाचा व महावितरण कंपनीचा काही एक संबंध नाही खोटी पास बनवून पेट्रोल भरत शिवाय सोबत आलेली टू व्हीलर गाडी सुद्धा दुसऱ्या कुणाची आहे सदरील इसमाने दारूच्या धुंदीत असे कृत्य केले असल्याचे लक्षात आले.पेट्रोल हे ज्वलनशील असून जर काही कृत्य घडले असते तर याला जबाबदार कोण यामुळे
सदरील प्रकरणात शिव पेट्रोल पंप चे मालक प्रशांत निकम व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सदरील इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button