Jalgaon

सावद्यातील व्यक्ति विशेष हाजी शेख हारुन यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने सन्मानित

सावद्यातील व्यक्ति विशेष हाजी शेख हारुन यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने सन्मानित

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

जळगांव जिल्ह्यात नव्हे व इतरांना हेवा सुटेल अशी आधुनिकतेची कास धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्रांतीच्या श्रेणीत येणारे कार्य म्हणजे सावदा सारख्या लहान गावांमध्ये गोरगरिबांच्या मुलांसाठी भव्य दिव्य सुंदर अद्ययावत इमारत स्वतःच्या खर्चाने शून्यातून भरारी घेणारे हाजी शेख हारून शेख इक्बाल यांनी डायमंड इंग्लिश मेडीयम शाळा उभारलेली असून शहरात अतिउत्तम दर्जाचे शैक्षणिक काम (हब) देखील निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकलेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात देखील ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी अग्रेसर असतात त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन कॉमन-वेल्थ ओकेशनल युनिव्हर्सिटी किंग्डम ऑफ टोंगा या बाहेरील देशाची जगप्रसिद्ध संस्थाने दखल घेऊन त्यांच्या दिल्ली येथील शाखा संस्था ठिकाणी एक भव्य दिव्य कार्यक्रमात दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी सावदा तालुका रावेर येथील हाजी इकबाल हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशनचे सचिव व डायमंड इंग्लिश मेडीयम या शाळेचे चेअरमन हाजी शेख हारून शेख इक्बाल यांना डॉक्टरेट पीएचडी पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे सावदा शहराचे नाव भारताची राजधानी दिल्लीच्या दरबारी फडकले या सन्मानार्थी शहरासह रावेर तालुक्याचे नाव देखील लौकिक झाले आहे. या अभिमानास्पद गोष्टीचा आनंद होऊन त्यांचे मित्र मंडळी व परिवारासह जिल्हाभरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव जोमाने व जल्लोषात होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button