Jalgaon

?जळगांव Live…जळगांव जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ‘फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

?जळगांव Live..जळगांव जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ‘फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ‘फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिली तर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुसऱ्या क्रमांकावर ‘कोविशील्ड’ लस घेऊन दुसऱ्या टप्पयाचा प्रांरभ करुन कोरोना लसीकरण सुरक्षित असल्याचा संदेशही दिला.
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. जिल्ह्यात ही लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात (16 जानेवारीपासून) आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजार 541 आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. तर शासकीय रुग्णालयात आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी त्यांना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ओपीडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोरोना लसीकरण केंद्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची संगणकावर नोंद झाल्यावर अधिपरिचारिका गायत्री पवार यांनी लस टोचून ‘फ्रंटलाईन वॅरीयर’ च्या लसीकरणाचा प्रारंभ केला. त्यानंतर डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी अनुक्रमे लस घेतली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले कि, कोरोना प्रतिबंधाची “कोविशील्ड” हि लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यासाठी आरोग्यासह कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असणाऱ्या (फ्रंटलाईन) सर्वानी वेळेत लसीकरण करून घ्यावे. डॉ. मुंढे यांनीदेखील कोरोना प्रतिबंधाची लस सुरक्षित असल्याचे सांगत लस घेण्यासाठी प्रत्येक फ्रंटलाईन वॅरियर यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिलीप पाटील, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, मोटार परिवहन विभागाचे पो.नि. समीर मोहिते, राखीव पो.नि. संतोष सोनवणे, जिल्हापेठचे पो.नि. विलास शेंडे, शनिपेठचे पो.नि. विठ्ठल ससे, रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. अनुराधा वानखडे, अधिसेविका कविता नेतकर, पीएसआय भरत चौधरी उपस्थित होते.
याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचारिका जयश्री वानखेडे, गायत्री पवार, कर्मचारी नितीन राठोड, सुरक्षा अधिकारी अजय जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, अभिषेक पवार यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button