Maharashtra

उत्तर उमरेडच्या वनक्षेत्रापासून वनमहोत्सवाला वृक्षलागवडीने सुरवात

उत्तर उमरेडच्या वनक्षेत्रापासून वनमहोत्सवाला वृक्षलागवडीने सुरवात

उत्तर उमरेडच्या वनक्षेत्रापासून वनमहोत्सवाला वृक्षलागवडीने सुरवात


प्रतिनिधी अनिल पवार

चांपा , ता .५:ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्षलागवड , संगोपन , संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे .वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदाच्या वनमहोत्सवास सोमवारी पासून उमरेड तालुक्यात वृक्षलागवडीने प्रारंभ झाला .
राज्यात पन्नास कोटी वृक्षलागवडीनुसार वडीसाठी धोरणात्मक आराखड्यानुसार यंदा ३३कोटी वृक्षलागवडीच्या यशस्वीतेसाठी जुलै ता .एक ते सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहेत .
उद्दिष्टाच्या तुलनेत उमरेड तालुक्यात राज्य शासनाच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी वनविभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वनमहोत्सवाला उत्तर उमरेड परीक्षेत्रापासून वृक्ष लागवडीचा प्रारंभ झाला .यावेळी उत्तर उमरेड परिक्षेत्रात एकूण ३ लक्ष २९ हजार १४५ वृक्षलागवडीचा संकल्प  उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए .के .मडावी यांच्या मार्गदर्शनात ३०सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . 
 उटी रोपवन कक्ष क्रं ४०३ मध्ये एकूण १८हेक्टर वनजमिनीवर आजपासून वृक्षलागवडीस सुरवात झाली .अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण  जिल्हापरिषद सभापती पुष्पाताई वाघाडे होते .उत्तर उमरेड परीक्षेत्रात आज  उटी रोपवन कक्ष क्रं ४०३-एकूण १८हेक्टर वनजमिनीवर वनविभागाच्या सहकार्याने मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला .
यात अमलतास , सागवन, आपटा , बेल , गुलमोहर , जांभूळ , चाफा , बकुळ,  कडुलिंब , जाकरडा, कदंब , निलगिरी आदी प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चांपा येथील सरपंच अतिश पवार होते .उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए .के .मडावी,  सोबतच मकरधोकडाचे वन क्षेत्र सहायक आर .एम .मेश्राम , वनरक्षक एम .के कुथे, के .पी .लांबधरे ,पी . आर .ननावरे , ए. ए.मेश्राम , वनमजूर बि .एस .पाल , व्ही. आर .ठाकरे , व्ही .डी .चौधरी , एम .एस .बावणे आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला .
         
       

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button