Chalisgaon

विविध विषयांच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल; प्रशासनाला धरले धारेवर

विविध विषयांच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल; प्रशासनाला धरले धारेवर

विविध विषयांच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल; प्रशासनाला धरले धारेवर

चाळीसगाव –  प्रतिनिधी नितीन माळे
तालुक्याची अर्थव्यवस्था हि शेतीवर अवलंबून आहे आणि त्यात चाळीसगाव तालुक्यात कापूस,मका व ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीके आहेत,मागील वर्षी कपाशी ह्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो त्यात ह्या वर्षी तशीच परिस्थिती मका ह्या पिकावर उद्भवली आहे यास्तव तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार अमोल गोरे यांना निवेदन देण्यात आले

विविध विषयांच्या मागण्या घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल; प्रशासनाला धरले धारेवर
यासह फळबाग,बोंडअळी,दुष्काळाची अनेक अनुदाने प्रलंबित असून शेतकरी बांधव सातत्याने तहसील कचेरीत चकरा मारत आहेत त्यातच संजय गांधी निराधार योजना उत्पनाचे दाखले यासह इतर कामांसाठी सर्वसामान्य नागरीक तहसिल कचेरीत फेऱ्या मारत असतांना आज तहसील कार्यालयात अनेक महिला व शेतकरी बांधव विविध योजनांची कागदपत्रे घेऊन आढळली त्यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा कथन केल्यात.राजीव देशमुख यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारला.जर सामान्य नागरिकांना वारंवार योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय व लोकप्रतिनिधींनी काढलेल्या विविध प्रकारच्या जत्रेत चकरा माराव्या लागत असतील तर प्रशासन यंत्रणेचा उपयोग काय असे राजीव देशमुख यांनी विचारत प्रशासनाला धारेवर धरले
यावेळी शासकीय योजनेच्या जत्रेविषयीच्या तक्रारी पदाधिकारी व उपस्थित शेतकरी बांधवांनी कथन केल्यात.तालुक्यात बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक एजंट तालुक्यात कार्यान्वित झाले आहेत.गरजू व पात्र लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जाते.जत्रेच्या नावाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र बोलावून प्रसिद्धी मिळविण्याचा उहापोह कशासाठी करण्यात आला.बोगस लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहराध्यक्ष शाम देशमुख,जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,जि.प.सदस्य अतुल देशमुख,पं.स.गटनेते अजय पाटील,तमगव्हाणचे मा.सरपंच किशोर पाटील,नगरसेवक रामचंद्र जाधव,अनिल जाधव,छगन पाटील,भैय्यासाहेब पाटील,अमोल चौधरी,मनोज भोसले,प्रकाश पाटील,शुभम पवार,यज्ञेश बाविस्कर,राकेश राखुंडे,श्रीकांत राजपूत,पिनू सोनवणे,निखिल देशमुख,हृदय देशमुख,कौस्तुभ राजपूत,गोकुळ पाटील,दिपक शिंदे,गुंजन मोटे,आकाश पोळ,रवींद्र पाटील,रोहीदास वंजारी,शेषराव पाटील,ललित पवार,कैलास निकम,जालम चव्हाण,अशोक पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button