sawada

माध्य.शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन सावदा येथील एका संचालकांनी केली संस्थेवर प्रशासक नियुक्तीची मागणी!

माध्य.शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन सावदा येथील एका संचालकांनी केली संस्थेवर प्रशासक नियुक्तीची मागणी!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्यात सन २०१२ मध्ये ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्था मार्फत ३ शिक्षकांची भरती प्रकरणी माजी अध्यक्ष शेख हारुन शेख इक्बाल यांनी फिर्याद दिल्यानंतर सावदा पोलिस ठाण्यात गु.र.नं.७०/२०२२ भा.द.वी.चे कलम ४२०,४०६,४६५,४६६,४६७,४७१,१२० (ब) अन्वये नोंद झालेल्या गुन्ह्यात सदरील शैक्षणिक संस्थाचे एकूण ६ संचालक सह तात्कालीन शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी अडकले असून यापैकी फक्त एकच संचालक शेख हनीफ शेख रशीद मंसुरी हा अटकेत असून उर्वरित ५ संचालक तेव्हा पासून अफरातफर झालेले आहेत.यामुळे सध्या स्थितीमध्ये शेडूल १ अनुसार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अकबर खान अमानुल्ला खान यांच्याकडे सदरची शैक्षणिक संस्थेचा कारभार चालविण्या इतका बहुमत नसून त्यांच्या सोबत फक्त १ ते २ संचालक सोडून बाकीच्या कोणत्याही संचालकांचे त्यांच्यावर व त्यांच्या सुरु असलेल्या संस्था संबंधीत कार्यभारावर अजिबात विश्वास नाही.

तसेच सध्या सदरील संचालक अफरातफर आहेत पोलीस तपासकाम देखील पुर्ण झालेला नाही.याची अधिकृत माहिती असताना सुद्धा अशी गंभीर व अतिसंवेदनशील स्थितीमध्ये विद्यमान शाळा समितीला कर्मचारी भरती व नियुक्ती विषयीचा कोणताही अधिकार नाही.तरी जोपर्यंत संस्थेतील कोणत्याही गटाकडे बहुमत सिद्ध होत नाही तोपर्यंत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा (रजि.नं. एफ.१०८८) या शैक्षणिक संस्थेचा कारभार चालवण्यासाठी थेट प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी.जेणेकरून या संस्थेमार्फत संचालित माध्यमिक ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेतील (इ.५ वी ते १० वी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार नाही व शाळेत विद्यादान करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील मानसिक त्रास उद्भवणार नाही.तरी या संवेदनशील विषयावर लक्ष देऊन तातडीने प्रशासकाची नियुक्ती करून थेट संस्थेचे अल्पमतात असलेले विद्यमान अध्यक्ष यांना नियमानुसार योग्य ती नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्यात यावी.अशी रीतसर मागणी लेखी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विभाग जि.प.जळगांव यांच्याकडे संस्थेचे माजी सचिव व विद्यमान संचालक अब्दुल अजीज अब्दुल रशीद मोमीन यांनी केली असून निवेदनावर त्यांचे नाव व सही देखील आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button