Kolhapur

श्री शाहू हायस्कूल,ज्यूनिअर कॉलेज,कागल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी.

श्री शाहू हायस्कूल,ज्यूनिअर कॉलेज,कागल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी.

सुभाष भोसले -कोल्हापूर
श्री शाहू हायस्कूल,ज्यूनिअर कॉलेज,कागल येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी करणेत आली.यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान,स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते ,आधुनिक भारताचे शिल्पकार ,जगाला शांतीचा सदेश देणारे शांतीदूत,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन प्राचार्य जे. डी. पाटील,उपमुख्याध्यापक एल.एस. डेळेकर, उपप्राचार्य बी के मडिवाळ ,पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी यांच्या हस्ते करणेत आले.तर ज्येष्ठ शिक्षक सजंय पोतदार ,काकासो भोकरे, महादेव घोरपडे,बाबासो शिंदे ,कादर जमादार,महेश शेडबाळे ,शंकर खाडे,शशिकांत सुदर्शनी,बाबासो हळीज्वाळे ,व इतर शिक्षकवृंद यानी पुष्पाजंली अर्पण केली.
कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक सूत्रसंचालन टी.ए.पोवार यांनी केले.ते म्हणाले की,पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.सर्व मुले त्यांना चाचा नेहरु म्हणून ओळखतात.
सौ ए.डी.जाधव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शैक्षणिक,राजकीय कार्य सांगितले त्या मनोगतात म्हणाल्या की,पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्य चळवळीत हिरेरीने सहभाग घेतला त्यांनी देशाचे आर्थिक नियोजन ठरविले व भारताला वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त करून दिला.

महेश शेडबाळे यांनी महाराष्ट्रात सरकारने सुरू केलेल्या व्यसनमुक्तीअभियानाविषयी माहिती दिली.त्यांनी धुम्रपानांचे दुष्परिणाम विदयार्थ्याना सांगीतले व तंबाखूजन्य पदार्थ टाळणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वानी जनजागृती करावी असा उपदेश दिला. यावेळी सर्वांनी व्यसनमुक्ती विषयक शपथ घेतली . एन.सी.सी च्या विदयार्थ्यानी रॅलींचे आयोजन केले.
या कार्यक्रमाला सर्व विदयार्थी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button