Mumbai

Mollywood…आणि दादा कोंडके यांना यामुळे आला उषा चव्हाण यांचा राग…बोलले नाहीत शेवटपर्यंत..

Mollywood…आणि दादा कोंडके यांना यामुळे आला उषा चव्हाण यांचा राग…बोलले नाहीत शेवटपर्यंत..

मुंबई मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार, हस्यसम्राट असणारे दादा कोंडके यांची लोकप्रियता संपूर्ण जगात आहे.आजही मराठी चित्रपट सृष्टीत त्यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते.विश्व रेकॉर्ड बुक मध्ये त्यांचे नाव आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.यशस्वी झाले. ब्लॉक ब्लास्टर हिट झाले.प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक नवीन कल्पनेचा चित्रपट दिला आहे. प्रत्येक चित्रपटात त्यांचा अभिनय देखील तितकाच उत्कृष्ट होता.प्रत्येक चित्रपटात त्यांनी सारखाच पोशाख ठेवला आहे हे देखील त्यांचे वैशिष्ट्य त्यामुळे त्यांचा तो पोषाखही खूप प्रसिद्ध आहे.

दादा कोंडके यांनी अनेक चित्रपट केले ज्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री होतीच. उषा चव्हाण या अनेक चित्रपटात कमाल अभिनय तर केलाच पण त्यांचा रेखीव सुंदर चेहेरा,गोड हास्य यामुळे आजही त्यांचे अनेक चाहते आहेत. याच उषा चव्हाण यांच्या वर दादा कोंडके नाराज झाले होते. याच कारण असे आहे की त्यांना उषा यांच्याशी विवाह करावयाचा होता.पण उषा यांचा विवाह दत्तात्रय देशमुख यांच्या शी झाला.ह्या एका कारणामुळे दादा उषा यांच्याशी बोलले नाहीत.

उषा चव्हाण यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे कुटुंब देखील कलेचे भक्त होते, घरात लोकनाट्य, आणि नाटकांमध्ये सारे व्यस्त राहत असत त्यामुळे अशा वातावरणात वाढल्याने उषा ताई यांच्यावर देखील कलेचे संस्कार झालेच. त्यांच्या आई सुद्धा एक अभिनेत्री होत्या त्यांनी दिगग्ज अभिनेते पृथ्वीराज कपूर सोबत अनेक मुक सिनेमात काम केले होते.

उषा ताईंचे लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी झाले होते.त्यांचे पुण्यात चांगलेच वर्चस्व होते. पुण्यातील जमीनदार होते ते तसेच 26 एकर हुन अधिक जमीनेचे ते मालक होते. त्या दोघांना ही एक मुलगा झाला आहे त्याचे नाव हृदयनाथ देशमुख असे आहे आणि आता त्यांच्या घरी उषाताई त्यांचा मुलगा, सून आणि रोहीत, रोहन नावाची नातवंड आहेत. हृदयनाथ एका बांधकाम फर्म चा मालक असून तो एक उद्योजक आहे.

उषाताई यानी आजवर अनेक चित्रपट केले आहेत, जवळपास 90 ते 100 चित्रपट त्यांचे गाजले आहेत. त्यांचा पहिला चित्रपट सोंगाड्या हा भरपूर प्रसिद्ध झाला होता, या चित्रपटा साठी दादा कोंडकेना एक अभिनेत्री ची गरज होती , तेव्हा सातारा बसस्थानकावर पहिल्यांदा दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची भेट झाली होती. त्यावेळी दादांनी या चित्रपटासाठी त्यांची निवड . उषाताई म्हणतात तो दिवस त्यांच्या आयुष्यातील खूप खास होता.त्यांनी 1971 मध्ये सोंगाड्या चित्रपटात काम केले होते. त्यांचा तो पहिला चित्रपट जरी असला तरीही त्याची प्रसिध्द गगनाला भिडलेली . या चित्रपटातील कथेचे लेखन वसंत सबनीस यांनी केले होते.

उषाताई या केवळ एक अभिनेत्री नसून एक उत्तम नर्तक आणि गायिका देखील होत्या. त्यांच्या या कलेमुळे लोक त्यांना खूप पसंत करत होते, त्यांनी अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे त्यातीलच एक म्हणजे ” मुक्काम पोस्ट ढेबेवाडी..” यामधील हिरव्या माडीचा जिना अवघड… या गाण्यात त्यांनी आपला आवाज मिसळून त्याला अनमोल करून टाकले. त्यांचे हे गीत खूप गाजले. या गाण्यात त्यांनी एक गायिका म्हणून देखील आणि नर्तक म्हणून देखील उत्कृष्ट काम केले. अनेक मराठीसह हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी आपले नृत्य सादर केले होते.

उषा आणि दादा कोंडके यांची जोडी खूप गाजली होती, दादांना सुद्धा उषाताई खूप आवडतं होती म्हणून त्यांनी लग्नाची मागणी घातली होती पण अभिनेत्री उषा चव्हाण यांनी लग्नासाठी दादांना नकार दिला, या गोष्टी मुळे दादांना खूप राग आला होता आणि राग उतरवून बदला घेण्यासाठी त्यांनी उषा चव्हाण यांच्या बायोग्राफी मध्ये कित्येक वाईट गोष्टी लिहल्या. या प्रकरणाचा खुलासा उषा यांनी स्वतः 6 ते 7 वर्षापूर्वी केला.

उषाताई यांनी मराठी सह तेलगू चित्रपटात ही काम केल्या होत्या,” दुर्दबिटा ” या चित्रपटात त्या प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांच्या विरोधात होत्या. तसेच ” शिर्डी के साईबाबा” या चित्रपटात ही त्यांनी उत्तम अभिनय केला होता. त्यांनी 100 च्या आसपास चित्रपट गाजवले आहेत त्यातील 80 ते 90 चित्रपटांना तरी गोल्डन जुबेली मिळाली होती. त्यामुळे त्या आजही तितक्याच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी रंगभूमीवर एक वेगळीच छाप पाडली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या चित्रपटातून त्यांची झलक अशीच रसिकांच्या नजरेसमोर झळकत राहो ही सदिच्छा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button