कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या अडचणी बाबत सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट .
नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे मानधन वाढ केल्याबद्दल मानले आभार…. कष्टकऱ्यांच्या विविध अडचणीबाबत केली चर्चा
सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी आज राज्याचे ज्येष्ठ मंत्री , राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगनराव भुजबळ यांची भेट घेतली व राज्यातील व जिल्ह्यातील असंघटित कामगार, बांधकाम मजूर ,यंत्रमाग कामगार, घर कामगार ,औद्योगिक कामगारांच्या अडचणीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
आशा कर्मचाऱी व गटप्रवर्तक यांचे मानधनवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी भुजबळ साहेबांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांना धन्यवाद दिले .सदरची वाढ 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू करावी अशी त्यांनी यावेळी भुजबळ साहेबांकडे मागणी केली.
त्याचवेळी डॉक्टर डी एल कराड यांनी कोरोना आणि लाक डाऊन मुळे रोजगार आणि उत्पन्न बुडालेल्या , अडचणीत आलेल्या आणि आयकर लागू नसलेल्या कुटुंबाला दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य केंद्र सरकारने द्यावे , यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा अशी मागणी भुजबळ याच्या कङे केली.
जिल्ह्यातील यंत्रमाग कामगार, असंघटित कामगार, बांधकाम मजूर,सलून कारागीर,घर कामगार ,रिक्षा व टॅक्सी चालक ,छोटे दुकानदार यांचा उत्पन्न आणि रोजगार बुडाला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे हे डॉ. कराड यांनी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले आणि केंद्र सरकार व राज्य सरकारने या अडचणीत असलेल्या नागरिकांना थेट आर्थिक मदत करण्याची मागणी केली. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही डॉक्टर कराड यांनी भुजबळ यांना केली
यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे , आशा कर्मचारी संघटनेच्या कल्पना ताई शिंदे, सिटूचे उपाध्यक्ष एडवोकेट तानाजी जायभावे चर्चेच्या वेळी उपस्थित होते






