Amalner

Amalner: कु. समीक्षा जाधव ची उत्तुंग भरारी…१२ वी च्या परीक्षेत कु.समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम..

Amalner: कु. समीक्षा जाधव ची उत्तुंग भरारी…१२ वी च्या परीक्षेत कु.समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम..

अमळनेर येथील कु.समीक्षा अविनाश जाधव ८९.१७% गुण मिळवून जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आली आहे.तसेच बायोलॉजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम आली आहे.ती सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव व मा.नगरसेविका कविता अविनाश जाधव यांची कन्या आहे.

तिचे धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील,उपाध्यक्ष.रावसाहेब के.डी.पाटील,खजिनदार दादासो.शैलेंद्र पाटील,सचिव.राधेश्याम पाटील,संचालक.नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तिचा गुणगौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिला संचालिका प्रा.नयना पाटील तसेच उपप्राचार्य अनिल पाटील,प्रा.पी.डी.पाटील,प्रा.योगिता पाटील,प्रा.पुनम वाघ,प्रा.राहुल रवंदळे, स्वप्निल पाटिल व अरविंद मोरे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Amalner: कु. समीक्षा जाधव ची उत्तुंग भरारी...१२ वी च्या परीक्षेत कु.समीक्षा अविनाश जाधव विज्ञान शाखेत प्रथम..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button